शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘परोली’ला बरगे नाहीत..पोळगाव रद्दच

By admin | Updated: December 16, 2014 23:53 IST

‘चित्री’वरील बंधाऱ्यांची अवस्था : ‘परोली’ पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरण होण्याची गरज

ज्योतिप्रसाद सावंत -आजरा तालुकावासीयांच्या योगदानातून उभारलेल्या ‘चित्री’ प्रकल्पांतर्गत आजरावासीयांकरिता बांधण्यात आलेल्या परोली बंधाऱ्यातील पाणी अडवण्याकरिता बरगेच नाहीत, तर पोळगाव बंधारा रद्दच झाल्याने चित्री प्रकल्पापासून सुमारे १२ कि. मी. अंतरावरील शेतकरी वर्गाला ऐन उन्हाळ्यात पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. चित्री प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांमधून याबाबत संताप व्यक्त होत आहे.आजमितीस चित्री प्रकल्पाचे काम शासनदरबारी ‘पूर्ण’ झाले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या रेट्याने पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लागला आहे. शासनाकडून आता ‘चित्री’करिता असणारा निधीही बंद होण्याच्या मार्गावर आहे, असे असताना दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या परोली बंधाऱ्यात पाणी अडविण्याकरिता बरगे नाहीत, अशी परिस्थिती असल्याने ‘चित्रीकाठी शेती; पण शेतीला चित्रीचे पाणी नाही’, अशी अवस्था शेतकरी वर्गाची आहे.दहा वर्षांपूर्वी २५ लाख रुपये खर्चून चित्री नदीवर परोली बंधारा बांधण्यात आला. चित्री मध्यम प्रकल्पापासून या बंधाऱ्यापर्यंत एकही बंधारा नाही. याच दरम्यान आजरा साखर कारखाना सुरू झाल्याने विशेषत: ऊस क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परोलीच्या अलीकडे पोळगाव बंधाराही बांधण्याचे नियोजन या प्रकल्पांतर्गत करण्यात आले होते; परंतु पोळगाव बंधाराच रद्द झाला .चित्रीच्या प्रवाहामध्ये असणारा सुमारे २० मीटरचा उतार परोली बंधाऱ्याशेजारील ३०० हेक्टर बागायत क्षेत्र पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. उन्हाळ्यात वारंवार होणारे वीज भारनियमन व पाणी सोडल्यानंतर ते वापरात आणण्यापूर्वीच नदीपात्रात होणारा पाण्याचा खडखडाट यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. लाखो रुपये खर्चून बंधारा बांधला; परंतु पाच ते सात लाख रुपयांचे बरगे टाकलेले नसल्याने शेतकरी वर्ग मात्र अडचणीत येत आहे. पोळगाव बंधाऱ्याकरिता आणलेले बरगे शिल्लक असल्याचे समजते. ते बरगे वापरल्यास पाणीसाठा होऊ शकतो, अशी स्थिती आहे. आजरा शहराची नवीन पाणीपुरवठा योजनाही याच ठिकाणाहून सुरू आहे. यासाठी तातडीने परोली बंधाऱ्यामध्ये पाणी अडवण्याची गरज आहे.मागणी आहे, पण पाणी नाही‘चित्री’वर बी.ओ.टी.तत्त्वावर वीज निर्मिती केंद्र खासगी कंपनीने सुरू केले आहे. शेतकरी पाणी मागतात. धरणात पाणी असते, पण पाणी वाया जाण्याच्या भीतीने खासगी कंपनीकडून पाणी सोडण्यावर मर्यादा येताना दिसतात.‘पाटबंधारे’कडे हस्तांतरणाची गरजबंधाऱ्यात पुढील प्रश्न मार्गी लागण्यासाठी हा बंधारा पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरण होणे गरजेचे आहे, तशी माणगीही पाटबंधारे विभागाने वारंवार जलसंधारणकडे केली आहे; पण धड पाणीही साठवलेले नाही व धड हस्तांतरणही नाही, अशीच अवस्था आहे.चित्री प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने चित्रीचा शासकीय निधी लवकरच बंद होणार आहे. निधी बंद झाल्यास पुन्हा परोली बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी नव्याने प्रयत्न करावे लागणार आहेत.