शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

उद्यान गाळेप्रश्नी खोकीधारकांचा मोर्चा

By admin | Updated: June 8, 2016 00:08 IST

जयसिंगपुरातील आंदोलन : भाजप शहराध्यक्ष धारेवर

जयसिंगपूर : शहरातील जयसिंग महाराज उद्यानाशेजारी असणाऱ्या दुकानगाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याच्या निषेधार्थ शहरातील खोकीधारक व हातगाडी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी भाजपचे शहराध्यक्ष मिलिंद भिडे यांच्या घरावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली़ भाजपचा जाहीर निषेध असो, गोरगरिबांना वेठीस धरणाऱ्या भाजपचा जाहीर निषेध, अशा आशयांचे फलक आंदोलकांनी धरले होते़ घरासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलक आल्याने तणाव निर्माण झाला़ शहरातील जयसिंग उद्यानालगत लोकांकडून पैसे घेऊन काही नगरसेवकांनी गाळे बांधून दिले. यासाठी रीतसर ठरावही करण्यात आल्याचा आरोप भाजपचे सरचिटणीस राजेंद्र दार्इंगडे यांनी करीत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती़ या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी जयसिंगपूर येथील सर्वच हातगाडी व खोकीधारकांनी आपले व्यवसाय बंद ठेवीत भाजपचे शहराध्यक्ष मिलिंद भिडे यांच्या घरासमोर निदर्शने केली़ सकाळी दहा वाजता जयसिंग उद्यानापासून मोर्चास सुरुवात झाली़ भिडे यांच्या घरासमोर आंदोलकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या़ आंदोलक त्यांच्या घराच्या दिशेने गेले़ ते सुनावणीकरिता मुंबईला गेले असल्याने व तेथे भाजपचा एकही पदाधिकारी हजर नसल्याने आंदोलकांनी दार्इंगडे यांच्या घरासमोर ठिय्या मारला़ ही खोकी नियमित करण्यासाठी भाजप प्रयत्न करेल, असे आश्वासन मिलिंद भिडे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याचे सुनील ताडे यांनी घोषित केले. (प्रतिनिधी)