शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

‘दाखलेबाज शाळां’मुळे पालक संतप्त

By admin | Updated: August 10, 2015 00:36 IST

ही सक्ती चुकीची असून, दाखले नसतील तर जनरल रजिस्टरमधून त्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन भरावी, असे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी : शासनाच्या सरल प्रणालीअंतर्गत शिष्यवृत्ती वा अन्य योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्यांची माहिती सर्व शाळांमधून संकलित केली जात आहे. मात्र, या योजनेची माहिती शिक्षकांना समजली नसल्याने त्यांच्याकडून विध्यार्थी व पालकांकडे बॅँक खाते पुस्तक, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, आधारकार्ड तसेच अन्य दाखल्यांसाठी सक्ती केली जात आहे. या दाखलेबाज शाळांमुळे पालकांची दमछाक होत आहे. ही सक्ती चुकीची असून, दाखले नसतील तर जनरल रजिस्टरमधून त्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन भरावी, असे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. दप्तराच्या ओझ्याने आधीच विद्यार्थी व पालक त्रस्त असताना त्यांना दाखले आणण्याच्या सक्तीमुळे आपला कामधंदा सोडून ही कागदपत्र जमवण्यातच वेळ घालवावा लागत आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी शिष्यवृत्ती योजना आहेत. अन्य काही योजनांतूनही विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ दिला जातो. खरेतर असे विद्यार्थी किती आहेत, त्यांचीच माहिती घेणे आवश्यक असताना सरसकट सर्व विद्यार्थ्यांची माहिती शिक्षकांमार्फत सर्व शाळांमधून घेतली जात आहे. विद्यार्थ्याचे बॅँक खाते पुस्तक आवश्यक असल्याचे सांगितले गेल्याने गेल्या आठवडाभरात पालकांना खाते पुस्तक सुरू करण्यासाठी बॅँकांमधून रांगा लावाव्या लागल्या. जातीची प्रमाणपत्र सर्वांकडेच काढलेली असतात असे नाही. दाखला काढायचा तर त्यासाठी काही काळ लागतो. तरीही जातीच्या दाखल्यांसाठी सक्ती केली जात आहे. उत्पन्नाच्या दाखल्यांसाठीही सक्ती केली जात असल्याने सेतूमध्ये पालकांच्या रांगा लागत आहेत. काही शाळांतून शिक्षक योग्यरित्या माहिती भरून घेत आहेत. उत्पन्न किती हे विद्यार्थ्यांच्या माहिती अर्जात नमूद केले तरीही चालते. त्यासाठी उत्पन्नाचा दाखला सेतूमधून आणण्याची आवश्यकता नाही, असेही काही शिक्षकांकडून सांगितले जाते. त्यामुळे खरे कोणाचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षकांनी दाखल्याची सक्ती केल्याने पालकांची तारांबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांची माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी (आॅनलाईन) भरून घेतली जात आहे. विविध योजनांबाबत विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देता येईल, असा त्यामागे उद्देश आहे. मात्र, ही माहिती घेण्याबाबत शिक्षकांना जे प्रशिक्षण देण्यात आले, त्यावेळी दाखल्यांची सक्ती नाही, असेही सांगितले गेले. विद्यार्थ्यांचे बॅँक खातेपुस्तक नसले तर पालकांच्या खात्याचा नंबर चालेल. विद्यार्थ्याचा जातीचा दाखला नसला तर वडिलांचा दाखला चालेल. उत्पन्नाचा दाखला नसला तर नुसते अर्जात उत्पन्न किती हे लिहिले तरी चालेल. आधार कार्डचा नुसता नंबरही अर्जात भरला तरी चालेल. तसेच यातील दाखले नसतील तर शाळांकडे असलेल्या जनरल रजिस्टरमध्ये विद्यार्थ्याच्या जातीबाबत व अन्य गोष्टींबाबतच्या माहितीवरूनही अर्ज भरता येईल. दाखल्यांसाठी सक्ती नाही, असे शिक्षकांना प्रशिक्षणाच्या वेळी सांगितले गेले आहे.-एकनाथ आंबोकर,शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग