शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

‘पानसरें’चे दोषारोपपत्र त्रोटक शमशुद्दीन मुश्रीफ : वाव असूनही तपास करण्याचे टाळले

By admin | Updated: January 16, 2016 00:48 IST

‘पानसरें’चे दोषारोपपत्र त्रोटक शमशुद्दीन मुश्रीफ : वाव असूनही तपास करण्याचे टाळले

कोल्हापूर : ज्येष्ठ सामाजिक नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्त्येचा तपास अपूर्ण आहे. कडक शिक्षा होईल इतके पुरावे दोषारोपपत्रात नाहीत. त्यामुळे वाव असूनही तपास करण्याचे टाळले आहे. दोषारोपपत्रातील पानांची संख्या अधिक असली तरी त्रोटक आहे, असे मत माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी शुक्रवारी मांडले.‘पानसरेंचा खून, अर्धवट तपास आणि अपूर्ण दोषारोपपत्र’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. शाहू स्मारक भवनात व्याख्यान झाले. ‘माकप’चे राज्य सदस्य चंद्रकांत यादव अध्यक्षस्थानी होते. यावेळी मुश्रीफ यांनी लिहिलेल्या ‘देशातील नंबर वन ची दहशतवादी संघटना आरएसएस’ व ‘करकरेंना कोणी व का मारले’ या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. मुश्रीफ म्हणाले, पानसरे हत्त्येचा दोषारोपपत्र गलेलठ्ठ आहे. त्यामध्ये खटल्यासाठीचे आवश्यक पुरावे कमी आहेत. प्रकरणात आरोेपी सनातनचा साधक समीर गायकवाडला अटक केली. मात्र, त्यांच्याकडून माहिती घेताना थर्ड डिग्रीचा वापर झाला नाही. समीरला फर्स्ट डिग्री वागणूक देऊन चौकशी केली. त्यामध्ये त्यांने पोलिसांना संभ्रमात टाकणारी, दिशाभूल करणारी उत्तरे दिली. खटल्यात अतिशय महत्त्वाचा पुरावा असलेला प्रत्यक्षदर्शी चौदा वर्षांच्या मुलाचा जबाब आहे. जबाबात त्या मुलाने मारेकऱ्यासंबंधी अतिशय बारकाईने निरीक्षण सांगितले आहे. त्या मुलाच्या जबाबात गोळ्या घालताना एक आजोबा व अन्य एक व्यक्ती पाहिल्याचे स्पष्ट होते. गोळ्यांचा आवाज आल्यानंतर पळपळ असे म्हटलेले आजोबा कोण? त्यांनी मुलांच्या भल्यासाठी पळ म्हटले की, मारेकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हटले याचा तपास झालेला नाही. समीरच्या साथीदारास पकडले नाही, हत्त्येसाठी वापरलेले हत्यार, मोटारसायकल जप्त केलेली नाही. अ‍ॅड. पानसरे यांनी अंधश्रद्धा, विषमतेच्या आणि ‘सनातन’च्या विरोधात प्रखर मते जाहीर व्यासपीठावरून मांडली होती, असे दोषारोपपत्रात आहे; पण गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ या विषयावर पानसरे बोलत होते. मग १६ फेब्रुवारी २०१५ रोजीच का हत्या झाली, या दिशेने तपास करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. ‘हु किल्ड करकरे’ या विषयावर राज्यभर व्याख्यान देणार असे घोषित केले. त्यांच्या १६ रोजीच्या हत्त्येचे कारण हेच आहे, असे मुश्रीफ यांनी सांगीतले. सतीशचंद्र कांबळे यांनी प्रास्ताविक केले. अनिल चव्हाण, स्मिता पानसरे, अ‍ॅड. बन्सी सातपुते, गिरीष फोंडे यांची भाषणे झाली. तेजस्विनी पांचाळ यांनी पाहुण्याची ओळख करून दिली. शेकापचे संभाजीराव जगदाळे उपस्थित होते. सभागृह खचाखच..पुस्तक खरेदीस झुंबडव्याख्यान ऐकण्यासाठी आलेल्या श्रोत्यांनी सभागृह खचाखच भरले होते. जागा नसल्याने व्यासपीठावर श्रोते बसले. बाहेर लावलेल्या स्टॉलवर मुश्रीफ यांची प्रकाशित झालेली पुस्तके खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडाली होती.