शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वडगावमध्ये कुत्र्यांच्या बिस्कीट गँगची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:27 IST

सुहास जाधव/लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : वडगाव नगरपालिका क्षेत्रात सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यात भरीस भर म्हणून ...

सुहास जाधव/लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : वडगाव नगरपालिका क्षेत्रात सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यात भरीस भर म्हणून प्राण्यांवर भूतदया दाखवणाऱ्या काही लोकांमुळे नवीन वसाहत परिसरात कुत्र्यांच्या एका टोळक्याची पाळीव प्राणी, माणसांवर हल्ले करण्यापर्यंत मजल गेली आहे. बिस्किटाच्या अमिषाने लाडावलेल्या या बिस्कीट गँगमुळे नवीन वसाहतीमधील नागरिक त्रस्त झाले आहेत.

शहराच्या पूर्वेकडील नवीन वसाहत, विद्या कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात मोकळी जागा असल्यामुळे दिवसभर ही कुत्री येथे पहुडलेली असतात. तसेच नवीन वसाहतीमधील काही नागरिक या कुत्र्यांना वारंवार बिस्किटे खाऊ घालतात. त्यामुळे येथे बिस्किटांच्या आशेने टोळके तयार झाले असून दिवसेंदिवस त्यांचा उपद्रव वाढत आहे. गेल्या आठवड्यात या कुत्र्यांनी एका बंगल्यातील बोकडावर हल्ला करत त्याचा फडशा पाडला. तर मंगळवार रात्री एका दुचाकीस्वाराचा पाठलाग केला. नशीब बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार त्यांच्या तावडीतून बचावला.

दिवसेंदिवस ही कुत्री आक्रमक होत असून त्यांचा परिसरातील वृद्ध, लहान मुलांनादेखील धोका निर्माण झाला आहे. नगरपालिका प्रशासनाने वेळीच यावर उपाययोजना करून कुत्र्यांच्या टोळक्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. त्याचप्रमाणे शहरातील इतर भागातील देखील कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाबद्दल उपाययोजना करण्याची गरज आहे.

अन्न सहज उपलब्ध

चौकातील चिकनची दुकाने, मटण मार्केट, मासे बाजार यांच्या खराब भागामुळे कुत्र्यांना आरामात खाद्य उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्यांची संख्या वाढत आहे. आंबेडकर चौक, सिद्धार्थनगर परिसर, भादोले रस्ता, नवीन वसाहत, पोलीस ठाणे परिसरात अशा मोकाट कुत्र्यांचा त्रास जास्त वाढला आहे.

कोट

नवीन वसाहतसह शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. झुंडीने कुत्री ठाण मांडून बसतात. त्याचा वयोवृद्ध, लहान मुलांना त्रास होत आहे. झुंडी हल्ला करतात. कंपाऊंडवरून घरात प्रवेश करतात. चपला, बूट पळून नेतात. दुचाकीच्या सीटकव्हरचे नुकसान करतात. अशा भटक्या कुत्र्यांचा पालिकेने बंदोबस्त करावा.- प्राचार्य एन. के. शिंदे,

फोटो : ११ वडगाव डॉग