शहरं
Join us  
Trending Stories
1
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
2
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
3
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
4
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
5
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव
6
VIRAL VIDEO : महिलेच्या केसांत अडकला हेअर कर्लर अन् पुढे जे झालं ते बघून तुम्हीही व्हाल हैराण!
7
महिला वर्ल्डकपमध्ये आता सेमीफायनलच्या एका जागेसाठी ३ संघांमध्ये चुरस, भारतासाठी असं आहे समीकरण
8
"सांसें उधार हैं... दिल तो महाकाल का है"; भस्म आरतीआधी भक्ताला हार्ट अटॅक, स्टेटसची चर्चा
9
जो जीव तोडून मेहनत घेतोय त्याला BCCI नं येड्यात काढलं? मुंबईकरासाठी बड्या राजकीय नेत्याची बॅटिंग
10
सलग ८८ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ₹१ लाखाचे झाले ₹२,६०,०००; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?
11
७ राशींवर कायम लक्ष्मी-कुबेर कृपा, पैसे कमीच पडत नाही; शुभ तेच घडते, तुमची रास आहे का यात?
12
समोश्यावरून वाद सुरू झाला अन् तलवारीच बाहेर निघाल्या! शेतकऱ्याच्या मृत्यूने परिसर हादरला
13
"समजलं तर ठीक, नाही तर...!", कॅनाडामध्ये पंजाबी सिंगर तेजी कहलोंवर गोळीबार; रोहित गोदारा गँगनं घेतली जबाबदारी
14
चित्रांगदा सिंह रुग्णालयात दाखल, ऐन दिवाळीत अभिनेत्रीची तब्येत बिघडली; नक्की झालं तरी काय?
15
प्रायव्हसी धोक्यात? 'Apple Maps' गुपचूप ट्रॅक करतंय तुमची प्रत्येक लोकेशन! लगेच बंद करा 'ही' सेटिंग
16
IND vs AUS : 'मी सचिनपेक्षाही अधिक धावा केल्या असत्या!' पण… ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा मोठा दावा
17
Happy Bhaubeej 2025 Wishes: भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या प्रेमळ नात्याच्या लडिवाळ शुभेच्छा!
18
लेडी सिंघम! १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलांची आई; स्वप्न केलं साकार, झाली IPS ऑफिसर
19
PPF vs FD: पीपीएफ की एफडी, कुठे गुंतवणूक केल्यावर मिळेल मोठा फायदा? कोणता पर्याय करुन देऊ शकते तुफान कमाई
20
Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहि‍णींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?

कार्यकारी संचालकांचे फेब्रुवारीअखेर पॅनेल

By admin | Updated: January 2, 2015 00:19 IST

साखर कारखाने : उच्च न्यायालयाचे साखर आयुक्तांना आदेश

प्रकाश पाटील - कोपार्डे -राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये नवे कार्यकारी संचालक मंडळ (एम. डी.) अस्तित्वात आणण्यासाठी फेब्रुवारी २०१५ अखेर सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. नवीन कार्यकारी संचालकांचे पॅनेल तयार करून त्याबाबतचा अहवाल फेब्रुवारीअखेर उच्च न्यायालयात सादर करावा, असा आदेश उच्च न्यायालयाने साखर आयुक्तांना दिला आहे. यामुळे राज्यातील ७० प्रभारी अथवा मुदतवाढ दिलेल्या एम.डी.च्या जागी पॅनेलवरील एम. डीं.ची नियुक्ती होणार आहे.दहा वर्षांपूर्वी २००४ पासून राज्यातील कारखान्यांमध्ये नवीन एम.डीं.च्या नेमणुका झालेल्या नाहीत. २००४ मध्ये गुजरातमधील इम्रा या संस्थेच्यावतीने साखर आयुक्तालयाने घेतलेल्या परीक्षेमध्ये ६६ उमेदवार एम. डी. पदासाठी पात्र ठरले होते. त्यातील ३३ जण साखर कारखान्यांत खातेप्रमुख म्हणून कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणारे होते. या ३३ उमेदवारांना वेगवेगळ्या कारखान्यांत या पदावर काम करण्याची संधी मिळाली.मात्र, उर्वरित ३३ उमेदवार हे एम. बी. ए. अथवा तत्सम विद्याशाखेतून आलेले होते. यांना प्रत्यक्ष साखर कारखानदारीतील अनुभव नव्हता. यामुळे बऱ्याच कारखानदारांनी यांना न घेता आपल्याच कारखान्यात असणाऱ्या खातेप्रमुखांना प्रभारी एम. डी. पदाची जबाबदारी देऊन कारखाने चालविण्याचा मार्ग स्वीकारला. याचबरोबर पॅनेलवर आलेल्या पण नियुक्ती न झालेल्या उमेदवारांच्यावतीने कैलास वाणी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. २००४ च्या पॅनेलमध्ये सर्व उमेदवारांना नोकरीची हमी, आय. एस. आय. दर्जाच्या अधिकाऱ्यांचा पगार व तत्सम सोयी सुविधांची मागणी केली व एम. डी. नियुक्तीला स्थगिती दिली. यामुळे गेली दहा वर्षे नवे एम. डी. पॅनेल करता आले नाही.दरम्यान, माढा येथील विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे प्रभारी एम. डी. राजेंद्र रणवरे यांच्यासह प्रभारी एम. डी. पदावर काम करणाऱ्या सुरेश तावरे, राजेंद्र जंगले, संजीव देसाई, प्रदीप रणवरे यांनी याबाबत उच्च न्यायालयात त्याविरोधात धाव घेतली होती. याबाबतची वास्तव परिस्थिती न्यायालयासमोर मांडली. त्यामुळे याप्रकरणी असलेला स्थगिती आदेश उच्च न्यायायाने रद्द ठरविला होता. त्यानंतर नवीन एम. डी. चे पॅनेल तयार करण्यासाठीची प्रक्रिया गतवर्षी सुरू झाली होती.तत्कालीन सहकारमंत्री साखर आयुक्तालय, साखर संघ आणि प्रभारी एम. डी. यांच्या प्रतिनिधींशी याबाबत चर्चा करून रेंगाळलेला हा प्रश्न सोडविण्यास गती दिली होती आणि एम.डी. पदासाठी आॅनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, शासकीय व प्रशासकीय पातळीवरील उदासिनतेने हा प्रश्न पुन्हा दुर्लक्षित झाल्याने राजेंद्र रणवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उच्च न्यायालयात दुसऱ्यांदा याचिका दाखल केली होती. त्यामुळे या प्रक्रियेला पुन्हा गती मिळाली असून, फेब्रुवारी २०१५ पर्यंत नवीन एम.डी. पॅनेल अस्तित्वात येणार आहे.संभाव्य परीक्षा १५ जानेवारीसकाही कारणाने एम. डी. पॅनेल निर्मिती मागील वर्षी थांबली होती. याबाबत न्यायालयाचे आदेश आले आहेत. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, यासाठी घ्याव्या लागणाऱ्या परीक्षेची संभाव्य तारीख १५ जानेवारी ठरविली आहे.- अशोक गावडे, जॉर्इंट डायरेक्टर, प्रशासन, साखर आयुक्तालय, पुणे