शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल जत्रेअंतर्गत पाणंद व वहिवाटीचे रस्ते खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या महसूल जत्रेअंतर्गत निवडणूक सुरू असलेली गावं वगळता अन्य गावांमधील पाणंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या महसूल जत्रेअंतर्गत निवडणूक सुरू असलेली गावं वगळता अन्य गावांमधील पाणंद रस्ते वहिवाटीसाठी खुले करण्याची मोहीम घेण्यात आली आहे. याअंतर्गत हडकुळी पाणंद (राधानगरी), नाझरे वसाहत (भुदरगड) दरम्यानचा ७०० मीटर पाणंद रस्ता आणि कसबा कोडोली (ता. पन्हाळा) येथील सराफ रोड पाणंद रस्ता ऊस वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सर्व ग्रामस्थांनी सामंजस्याने पाणंद व रस्ते खुले करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा आणि या कामात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुुरुवारी केले. जिल्ह्यात सुुरू असलेल्या महसूल जत्रेअंतर्गत १ हजार २२५ गावांमध्ये किमान एका गावातील अतिक्रमण काढून पाणंद रस्ता वहिवाटीस खुला करण्याचे उद्दिष्ट आहे. यानुसार गावांमधील पाणंद रस्ते ग्रामस्थांच्या सहकार्याने, सर्वसंमतीने आणि सामंजस्याने खुले करण्यात येत आहेत.

कसबा वाळवे मंडळातील मौजे माजगाव (ता. राधानगरी) मधील हडकुळी पाणंद रस्ता, तसेच मौजे मानवळे (ता. भुदरगड) येथील भांडेबांबर पैकी नाझरे वसाहत ते सुतार शेत नदीकाठ एकूण सातशे मीटर पाणंद रस्ता ऊस वाहतुकीसाठी खुला केला आहे. पन्हाळा तालुक्यातील कसबा कोडोली येथील सराफ रोड पाणंद रस्ता ऊस वाहतुकीसाठी खुला करून दिला.

दुसऱ्या टप्प्यात १५ जानेवारीनंतर उर्वरित गावांमधील अतिक्रमणे काढून पाणंद रस्ते खुले करण्यात येणार आहेत. ग्रामस्थांनी सामंजस्याने आणि सर्वसंमतीने पाणंद व रस्ते खुले करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा आणि या कामात सहकार्य करावे, असे आवाहन करून ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार जिल्हाधिकारी देसाई यांनी मानले.

--------

फोटो नं २४१२२०२०-कोल-महसूल जत्रा

ओळ : कोल्हापूर जिल्ह्यात सुुरू असलेल्या महसूल जत्रेअंतर्गत विविध गावांमधील पाणंद रस्ते वहिवाटीसाठी खुले करण्यात येत आहेत.

--

इंदुमती गणेश