शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

(पान १ व राज्यासाठी) मराठा आरक्षणाच्या अंतिम लढाईला प्रारंभ; आता स्वस्थ न बसण्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST

कोल्हापूर : कोणत्याही वर्गाचे आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला घटना दुरुस्ती करून स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीच्या रस्त्यावरील अंतिम ...

कोल्हापूर : कोणत्याही वर्गाचे आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला घटना दुरुस्ती करून स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीच्या रस्त्यावरील अंतिम लढाईला ऐतिहासिक कोल्हापुरातून गुरुवारी जोरदार पावसाच्या साक्षीने सुरुवात झाली. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील या अंतिम लढाईचे रणशिंग फुंकताना मराठा समाज आता आरक्षण मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा संदेश या मूक आंदोलनातून देण्यात आला.

आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधिस्थळी गुरुवारी झालेल्या मूक आंदोलनात राज्यभरातून आलेल्या मराठा समाजातील प्रमुख समन्वयक, तसेच जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत अंतिम लढाईची ज्योत प्रज्वलित झाली. आता मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यावरच ती शांत होईल.

या आंदोलनाची दाखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाने घेतली असून, आमच्या अखत्यारितील ज्या पाच प्रमुख मागण्या आहेत, त्या चर्चेतून सोडविण्याची ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच आज, शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करून चर्चा घडवून आणली जाईल, आपण चर्चेला यावे, अशी आग्रही विनंती दोन्ही मंत्र्यांनी खासदार संभाजीराजे यांना केली.

राज्य शासनाने दिलेल्या निमंत्रणाचे खासदार संभाजीराजे यांनी स्वागत केले. चर्चेला जायचे की नाही हे सर्व समन्वयकांशी बारकाईने विचारविनिमय करून निर्णय घेऊ, तोपर्यंत जर आमच्या पाच प्रमुख मागण्या पूर्ण केल्या, तर नाशिक येथील मूक आंदोलनाऐवजी विजयोत्सव साजरा करू, असे संभाजीराजेंनी स्पष्ट केले.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षण मिळवून देण्याच्या बाबतीत राज्य सरकार ठाम आहे. यापूर्वी झालेल्या चुका टाळून आरक्षण देईपर्यंत जी-जी जबाबदारी राज्य सरकारची असेल ती-ती पार पाडण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे स्पष्ट केले.

-राजकारण न करता चुका मान्य करू या

‘वाट्टेल ती किंमत देऊ, पण आरक्षण मिळवून देऊ’, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जी चूक मागच्या राज्य सरकारकडून झाली, तीच चूक आमच्या सरकारकडूनही झाली. आता राजकारण करत न बसता या चुका मान्य करून समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या प्रक्रियेत भाजपनेदेखील आता सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी त्यांनी केले.

-पंतप्रधान का बोलत नाहीत?

मराठा आरक्षणाचे आंदोलन गेले अनेक वर्षे सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयापर्यंत युक्तिवाद झाले. तरीही आरक्षण मिळाले नाही. मराठा समाज अस्वस्थ असताना आणि तो आरक्षण मागत असताना केंद्र सरकारचे प्रमुख असणारे पंतप्रधान याबाबत का बोलत नाहीत? असा सवाल शाहू छत्रपती यांनी या वेळी उपस्थित केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. सभागृहात पंतप्रधानांचे बहुमत आहे. त्यामुळे त्यांनीच आता जबाबादारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

-राज्यभरातील कार्यकर्त्यांचा सहभाग

जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, तसेच राज्यभरातील मराठा समाजाचे समन्वयक यांनी मूक आंदोलनात सहभाग घेतला. ‘समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनी बोलावे’ या आवाहनानुसार केवळ लोकप्रतिनिधींचीच या वेळी भाषणे झाली. जोरदार पावसात भिजत आंदोलनाची सांगता होईपर्यंत सर्व जण बसून होते.