शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

पाडगावकरांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते

By admin | Updated: December 31, 2015 00:42 IST

मंगेश पाडगावकर हे अत्यंत संवेदनशील व खऱ्या अर्थाने माणूसपण जपणारे साहित्यिक क्षेत्रातील एक तारा होते.

कवी मंगेश पाडगावकर यांनी मराठीत विविध स्वरूपी कविता लिहिल्या. सन १९६० नंतरच्या आधुनिक कवितेत रोमँटिक जाणीवेच्या प्रवाहातील ती एक महत्त्वाची कविता मानली गेली. काळाच्या टप्प्यांवर ती बदलतही राहिली. प्रेम, निसर्ग, सामाजिक व राजकीय जाणीवेची कविता त्यांनी लिहिली. बालकविता, वात्रटिका, भावगीते लिहिली. त्यांच्या सांस्कृतिक कामगिरीचे एक महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे महाराष्ट्रभर त्यांनी कविता लोकप्रिय केली. त्यांच्या कवितासंग्रहाच्या पंधरा-वीस आवृत्त्या निघाल्या. त्यावरून या लोकप्रियतेचे स्वरूप ध्यानात येते. महाराष्ट्रातील अनेक गावांशी त्यांचा जसा काव्यवाचनाच्या निमित्ताने संबंध आला तसा तो कोल्हापूरशी देखील आला. या भूमीविषयी त्यांच्या मनात आदराची भावना वसत होती.सन १९६० च्या दशकानंतर विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर यांनी राज्यात काव्यवाचनाचे कार्यक्रम केले. या काळात ते कोल्हापुरात ते अनेकवेळा आले. विंदा करंदीकर हे येथील राजाराम महाविद्यालयात शिकले याचे पाडगावकर यांना मोठे कौतुक होते. शिवाजी विद्यापीठातदेखील पाडगावकर व्याख्यानानिमित्त आले होते. विद्यापीठाचे गीतही त्यांनी लिहिले होते. कोल्हापूर महापालिकेच्या व्याख्यानमालेअंतर्गत ते आले होते. केशवराव भोसले नाट्यगृहात त्यांची प्रकट मुलाखत झाली होती त्यावेळी सभागृह तुडुंब भरले होते. या मुलाखतीत त्यांनी बालपणापासूनच्या हृद्य आठवणी सांगितल्या. या कार्यक्रमानंतर त्यांनी अक्षरदालन ग्रंथ संग्रहालयास भेट दिली होती. कोल्हापुरातील विविध व्यक्तींशी ते संबंधित होते. कादंबरीकार बाबा कदम, कराडमधील श्रीनिवास कुलकर्णी यांच्या घरी हमखास जायचे. या दोन्ही कुटुंबीयांशी त्यांचे जवळचे संबंध होते. बऱ्याच वेळेस कादंबरीकार बाबा कदम यांच्या घरी ते मुक्कामाला असायचे. प्रा. गो. मा. पवार आणि डॉ. चंद्रशेखर जहागीरदार यांच्याकडे ते कार्यक्रमानिमित्ताने आल्यानंतर राहायचे. अरुण नाईक यांच्या विवाहास त्यांनी जे शुभेच्छा पत्र पाठविले होते. ते नाईक यांनी निमंत्रण पत्रिकेसाठी वापरले होते. आहार संस्कृती पाडगावकर यांचे खास असे प्रेम होते. मांसाहार विशेषत: मासे त्यांना आवडायचे. कोल्हापुरातही या प्रकारच्या भोजनाला ते अग्रक्रम द्यायचे. त्यांचे कोल्हापूरशी एक जिव्हाळ्याचे नाते होते. - प्रा. डॉ. रणधीर शिंदे (मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) मंगेश पाडगावकर यांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी माझ्या ‘रातवा’ आत्मचरित्राचे कौतुक केले होते. ते कोल्हापुरातील कार्यक्रमांना आवर्जून यायचे. त्यांचे साहित्य पूर्वीच्या आणि नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. मराठी साहित्यविश्वाला त्यांनी समृद्ध केले. कविता जगायला शिकविणारे आणि स्वत: कविता जगणारे असे ते कवी होते. त्यांच्या निधनामुळे साहित्यक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. - चंद्रकुमार नलगे, ज्येष्ठ साहित्यिककवी पाडगावकर हे रसरशीत आयुष्य जगले. ते ऊर्जेचा स्रोत होते. त्यांना भेटल्यानंतर आश्वासक वाटत होते. त्यांच्या कविता या सकारात्मकपणे जगायला शिकविणाऱ्या होत्या. त्यांच्या निधनामुळे अतीव दु:ख झाले आहे. - अरुण नाईक, साहित्यिककवी पाडगावकर हे माझ्या दृष्टीने प्रेमाचा वटवृक्ष होते. त्यांनी स्वत:वर प्रेम केले, तसेच इतरांवर प्रेम करायला शिकविले. त्यांच्या कविता मनाला भावणाऱ्या होत्या. त्यांच्या निधनामुळे प्रेमाच्या वटवृक्षाला आम्ही मुकलो आहोत.- निलांबरी कुलकर्णी, कवयित्रीमंगेश पाडगावकर हे अत्यंत संवेदनशील व खऱ्या अर्थाने माणूसपण जपणारे साहित्यिक क्षेत्रातील एक तारा होते. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचा ‘हृदयस्पर्शी व्यासपीठा’तर्फे सत्कार केला होता. त्यांच्या कविता, साहित्य हे आजच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे.- पद्माकर कापसे, अध्यक्ष, हृदयस्पर्शी हौशी सांस्कृतिक व्यासपीठ