शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

अंधत्वावर मात करुन विक्रीकर पदाला गवसणी

By admin | Updated: March 18, 2017 22:31 IST

समाजात प्रकाश : गजानन दीक्षित यांचे यश

पसरणी : मूळचे पसरणी, ता. वाई येथील व सध्या वाईमध्ये वास्तव्यास असलेल्या आणि अंध असणाऱ्या गजानन दीक्षित यांनी ‘जिद्द चिकाटी’च्या जोरावर अंधत्वावर मात केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक व कर सहायक या दोन्ही परीक्षेत अंध विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रात पहिला व संपूर्ण परीक्षार्थींमध्ये २० वा क्रमांक त्यांनी मिळवल्याने कौतुकाचा वर्षाव होत आहे.गजानन दीक्षित यांचे वडील वाईच्या किसन वीर महाविद्यालयात शिपाई पदावर काम करत होते. गावी शेती नसल्याने एकट्याच्या जीवावर घरची परिस्थिती होती. आई गृहिणीचे काम करत असे. परंतु गजाननला खूप शिकायचे होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पसरणी येथे झाले व उच्च शिक्षणासाठी किसन वीर महाविद्यालय गाठले. परंतु न डगमगता संघर्ष सुरू ठेवला. पुढे बी. एड, डी. एड. पूर्ण करून एलएलबीसाठी प्रवेश घेतला. हे करत असताना वाई पंचायत समितीमध्ये २००६ पासून फिरते विषय शिक्षक पदावर कंत्राटी स्वरूपात कार्यरत राहिले.‘सातारा जिल्ह्याची आर्थिक व सामाजिक स्थिती’ या विषयावर पीएच.डी चे त्यांचे संशोधन सुरू आहे. पत्नी पूनम दीक्षित व परिवर्तन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक संग्राम पिसाळ यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले. विक्रीकर निरीक्षक व कर सहायक या दोन्ही परीक्षेत महाराष्ट्रामध्ये अंध विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक व सर्व विद्यार्थ्यांमध्ये २० वा क्रमांक मिळाल्याने त्यांची शिक्षणाविषयीची आवड व जिद्द चिकाटीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. (वार्ताहर)मोबाईल रेकॉडिंगचा आधारगजानन दीक्षित यांना डोळ्यांनी दिसत नसल्याने त्यांचे मित्र संग्राम पिसाळ व पत्नी अभ्यासक्रम मोठमोठ्याने वाचून दाखवत व मोबाईलमध्ये त्याचे रेकॉर्डिंग करत. दीक्षित ते पुन्हा-पुन्हा ऐकत व अभ्यास करत. शिक्षणाविषयीचे प्रेम त्यांची जिद्द यांनी अंधत्वावर मात करत शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन केले आहे.