शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरच्या खासदारांचा हातभार

By admin | Updated: July 17, 2014 00:19 IST

विकासाला हातभार

प्रवीण देसाई - कोल्हापूरआतापर्यंत बाहेरील राज्यसभा खासदारांनी जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावला आहे. यावर्षीही खासदारांनी जिल्ह्यासाठी निधीची शिफारस केली आहे. पुण्याचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी शाहूवाडी तालुक्यासाठी तब्बल दोन कोटी तीन लाख रुपये, तर राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी शहरातील विकासकामांसाठी ६० लाख रुपये निधीची शिफारस केली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात (कळंबा जेल) सात शौचालये बांधण्यासाठी ३ लाख ५० हजार रुपये निधी देण्यासाठी कॉँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला यांनी पत्र दिले आहे. तोंडावर असलेले आचारसंहितेचे सावट पाहता या शिफारशींवर पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये लगबग सुरू आहे.काकडे यांचा कोल्हापूर किंवा शाहूवाडीशी तसा कोणताही संबंध नसताना आपल्या एकूण निधीच्या जवळ-जवळ अर्ध्या निधीची शिफारस जिल्ह्यातील एका तालुक्यासाठी केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. शाहूवाडी तालुक्यातील ४४ गावांमधील रस्ते कॉँक्रिटीकरण, पाईपलाईन, संरक्षकभिंत बांधणे, पाण्याची टाकी बसविणे, आदी कामांसाठी हा निधी आहे. शुक्ला यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहासाठी सात शौचालयांकरिता ३ लाख ५० हजार निधी देण्याची शिफारस केली आहे. त्याबरोबरच वंदना चव्हाण यांनी कोल्हापूर शहरासाठी ६० लाख रुपये निधीची शिफारस केली आहे. यामध्ये क्रीडा व व्यायाम साहित्यासाठी १५ लाख रुपये व सामाजिक सभागृह-सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी ४५ लाख रुपयांचा समावेश आहे. याशिवाय आतापर्यंत म्हणजे २०११-१२ ते २०१३-१४ या काळात एकूण ११ राज्यसभा सदस्यांकडून जिल्ह्यासाठी २ कोटी ३० लाख ४७ हजार ६५४ रुपये निधी मंजूर झाला आहे. यातील बहुतांश निधी विविध कामांवर खर्चही झाला आहे. यामध्ये कॉँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील सामाजिक सभागृह बांधकामासाठी १५ लाख रुपये मंजूर केले आहेत. त्याबरोबरच भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी ५५ लाख रुपये, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी ४ लाख रुपये, कॉँग्रेसचे डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी २५ लाख रुपये, भाजपचे खासदार पीयूष गोयल यांनी २७ लाख ४७ हजार ६५४ रुपये, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी पाच लाख रुपये दिले आहेत.कॉँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी ४१ लाख रुपये, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तत्कालीन खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी १० लाख रुपये, शिवसेनेचे तत्कालीन खासदार मनोहर जोशी यांनी तीन लाख रुपये, भाजपचे तत्कालीन खासदार बाळासाहेब आपटे यांनी तीन लाख रुपये, तत्कालीन राष्ट्रवादीचे खासदार गोविंदराव आदिक यांनी २५ लाख रुपये मंजूर केले आहेत.