शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आंतरपिकातून निघाला उत्पादन खर्च

By admin | Updated: December 16, 2014 23:45 IST

एकरी ८० टन ऊस उत्पादनाचा बोनस : लाटगाव येथील शेतकऱ्याचा प्रयोग

१२०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस असणाऱ्या भागात ऊस लागवड करणे उत्पादनाच्या दृष्टीने अडचणीचे असते, असे कृषितज्ज्ञांकडून सांगितले जात असतानाच चित्री प्रकल्पाच्या शेजारी असणाऱ्या व तीन ते चार हजार मि.मी. पाऊस असणाऱ्या लाटगाव येथे बापूसाहेब खामकर यांनी एकरी ७५ ते ८० टन ऊस उत्पादित केला असून, दोन एकरांमध्ये घेतलेल्या उसामध्ये कलिंगड हे आंतरपीक घेऊन त्यांनी उसाचा संपूर्ण खर्च आंतरपिकातून वसूल केला, तर दोन एकरांमधून दीडशे टन ऊस बोनस रूपात मिळणार आहे.खामकर यांनी दोन क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पाच फुटी सरी सोडून फुटावर उसाची डोळा लागण केली. ठिबक सिंचनच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला. एका डोळ्याला सुमारे २५ ते ३० फुटवे आले असून, यंदा विक्रमी उत्पादन मिळणार, असे चित्र आहे. पहिल्या टप्प्यात जानेवारीपर्यंत या ओढ्यातील पाणी शेतीसाठी वापरले जाते, त्यानंतर चित्रीतील पाणी ओढ्यामधील बंधाऱ्यात साठवून शेतीसाठी वापरले जाते. खामकर यांनी ऊस पिकाचे उत्पादन घेतानाच त्यांनी कलिंगड या आंतरपिकाद्वारे ४० हजार रुपयांची घसघशीत कमाई करीत दोन एकरांतील उसाचा उत्पादन खर्चही वसूल केला आहे. सांगली येथील स्वप्निल कनगुले यांचेही खामकर यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.- ज्योतिप्रसाद सावंत, आजरा१० ते १४ किलो वजनाची कलिंगडेखामकर यांनी घेतलेल्या आंतरपीक स्वरूपातील ‘कलिंगड’ पिकाचेही आश्चर्यकारक निकष त्यांना मिळाले असून, प्रत्येक कलिंगडाचे वजन सरासरी १० ते १४ किलो इतके भरले.शेतकऱ्यांकरिता पथदर्शकप्रतिकूल परिस्थितीतही अत्यंत चिकाटीने घेतलेले हे पीक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पथदर्शक ठरत आहे. अनेक शेतकरी खामकर यांच्या शेतामध्ये भेट देत असून, एकरी १०० टन ऊस उत्पादित करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला.