शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा खरेदी कर वसूल करू

By admin | Updated: January 16, 2016 00:15 IST

विपीन शर्मा : सॉफ्ट लोनच्या व्याजातील सवलतही काढून घेतली जाईल

कोल्हापूर : निर्यातीचा निर्णय घेतल्यानेच बाजारातील साखरेचे दर वाढत आहेत; पण कारखान्यांना ठरवून दिलेल्या कोट्यानुसार निर्यात केली जात नसल्याचे निदर्शनास आले असून, याबाबत केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर गांभीर्याने विचारविनिमय सुरू आहे. जे कारखाने साखर निर्यात करणार नाहीत, त्यांच्याकडून खरेदी कर वसूल केला जाणारच; त्याबरोबरच सॉफ्ट लोनच्या व्याजातील सवलतही काढून घेतली जाईल, असा इशारा साखर आयुक्त विपीन शर्मा यांनी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींना दिला. राज्यातील साखर हंगामाची आढावा बैठक पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत शुक्रवारी झाली. यावेळी त्यांनी कारखाना प्रतिनिधींना धारेवर धरले. गत हंगामातील थकीत एफआरपीसाठी बारा कारखान्यांचे परवाने रद्द केले आहेत. २२ जानेवारीपर्यंत पूर्तता करणाऱ्यांचा परवाना पुढे कायम करू. काही कारखाने परवाना न घेताच सुरू झाले आहेत, त्यांना नोटिसा काढल्या आहेत. साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे केंद्र सरकारने निर्यातीचा निर्णय घेतला, प्रत्येक कारखान्याला कोटा दिला. त्यामुळे बाजारातील साखरेचे दर वाढले. दुष्काळामुळे पुढील हंगामात साखरेचे उत्पादन कमी होणार असल्याने साखरेला चांगला भाव मिळू शकतो, म्हणून काही कारखान्यांनी निर्यात केलेली नाही, पण सगळ्यांनीच असा विचार केला, तर पुढील हंगामात उत्पादन कमी होऊनही दर कोसळतील, अशी भीती शर्मा यांनी व्यक्त केली. निर्यातीबाबत पंतप्रधान कार्यालय गंभीर असून, कारखान्यांचा प्रतिसाद पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, निर्यात केली नाही तर सरकारला हस्तक्षेप करावा लागेल असा इशारा दिला आहे. त्यामुळे निर्यातीबाबत केंद्र व राज्य सरकार फारच गंभीर आहे हे लक्षात ठेवा. जे कारखाने निर्यात करणार नाहीत, त्यांच्याकडून खरेदी कर वसूल केला जाईल. तसेच शासनाच्या सवलती रद्द करून मागील हंगामात दिलेले सॉफ्ट लोनचे व्याज सरकार भरणार नाही. याबाबत आठवड्यात अहवाल द्या. अडचणीच्या काळात सरकारने एवढी मदत करूनही कारखानदार आदेशाचे पालन करणार नसतील तर सरकार पुन्हा दारात उभे करून घेणार नाही, अशा शब्दांत विपीन शर्मा यांनी कारखानदारांचा समाचार घेतला. बैठकीला साखर संचालक किशोर तोष्णीवाल यांच्यासह सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘त्या’ कारखान्यांची जप्तीमागील हंगामातील ‘एफआरपी’प्रमाणे पैसे शेतकऱ्यांना न देणारे व यंदाच्या हंगामात बंद असणाऱ्या कारखान्यांची जप्ती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यातून शेतकऱ्यांचे पैसे दिले जातील, असे आयुक्तांनी सांगितले. सुनावणी नाही; थेट कारवाईचसाखरेचे दर कमी असल्याने ८०:२० फॉर्म्युला करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा निर्णय घेतला. तरीही कारखान्यांना नोटिसा काढून पैसे देण्याबाबत सांगावे लागते. आता तर साखरेचे दर वाढले आहेत. बॅँकेच्या उचलीत वाढ झाली नसली, तरी कारखान्यांच्या पातळीवर तडजोड करून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत. आता सुनावणी घेणार नाही, थेट कारवाईच करणार, असा इशारा आयुक्त शर्मा यांनी दिला.