शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘केआयटी’मध्ये आयआयमूनतर्फे संयुक्त राष्ट्र संसदेचे आयोजन

By admin | Updated: March 4, 2015 23:51 IST

शनिवारपासून प्रारंभ : महाराष्ट्र, कर्नाटकातील १५० विद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय राजकारणात विद्यार्थ्यांचा रस वाढावा, त्यांना संयुक्त राष्ट्र संसदेच्या कामकाजाची माहिती व्हावी, या उद्देशाने केआयटी कॉलेजमध्ये इंडियन इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स्च्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे (आयआयमून) संयुक्त राष्ट्र संसदेचे आयोजन केले आहे.शनिवार (दि.७) पासून तीन दिवस संसद होणार आहे. त्यात महाराष्ट्र, कर्नाटकातील १५० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा स्वरूपातील संसद होत आहे, अशी माहिती ‘केआयटी’चे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी व कार्यक्रमाच्या समन्वयक सृजनी श्रावणे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.डॉ. कार्जिन्नी म्हणाले, आयआयमून ही संकल्पना संयुक्त राष्ट्र संसदेची प्रतिकृती आहे. त्यात संयुक्त राष्ट्रसंघाचे काम, उद्दिष्टे याबाबत सहभागी विद्यार्थ्यांना माहिती व प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. यात सहभागी विद्यार्थ्यांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती, डीआयएससी, लोकसभा व शंभर स्मार्ट सिटीची शक्यता, आंतरराष्ट्रीय पत्रकारिता या विभागात विभागणी केली आहे. समन्वयक श्रावणे म्हणाल्या, आयआयमून ही आशियातील मोठी युवा संस्था आहे. त्यात १९ ते २२ वर्षांतील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. केआयटीमधील संयुक्त राष्ट्र संसदेचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी सहा वाजता कोल्हापूर जिल्हा आयटी असोसिएशनचे अध्यक्ष विनय गुप्ते यांच्या हस्ते होईल. रविवारी (दि. ८) व सोमवारी (दि. ९) चर्चा, वादविवाद आणि विविध विषयांवरील सादरीकरण होईल. त्यात सहभागी विद्यार्थी हे शालेय व महाविद्यालयीन आहेत. रोटरॅक्ट व इनरव्हील क्लब आॅफ कोल्हापूर यांच्या सहकार्याने कार्यक्रम होणार आहे. या संसदेतील ठराव ‘युनो’ला पाठविण्यात येतील. कार्यक्रमात ‘आयआयमून’चे उपाध्यक्ष अमन बालडिया व सहायक संचालक शुभम रामचंदानी हे मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार परिषदेस इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा कविता पाटील, प्रमोद पाटील, मोनिका सानंदम, राजेंद्र हेद्दूर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)