शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

By admin | Updated: July 26, 2014 00:36 IST

पंचगंगा प्रदूषण प्रकरण : १२ आॅगस्टला सुनावणी

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या औद्योगिक आस्थापनावर कोणती कारवाई करणार, याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने द्यावे तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्रदूषणविषयी त्रुटींची पूर्तता कशी करणार याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. अभय ओक व न्या. ए. एस. चांदुरकर यांच्या खंडपीठाने आज दिले. या संबंधातील याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून निरीच्या शिफारशींची अंमलबजावणी संबंधित घटकांनी कालबद्ध कार्यक्रमात पूर्ण करण्याचे अंतरिम आदेश दिले जातील, असे स्पष्ट करत निर्णय राखून ठेवला. पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत येथील प्रजासत्ताक सामाजिक संस्था तसेच इचलकरंजीतील दत्ता माने व सदाशिव मलाबादे यांनी जनहित याचिका दाखल केल्या असून, त्याची एकत्रित सुनावणी सुरू आहे. माने व मलाबादे यांच्यातर्फे अ‍ॅड. धैर्यशील सुतार काम पहात आहेत. मार्च महिन्यानंतर केंदाळाचा प्रादुर्भाव दरवर्षी पंचगंगा नदीमध्ये होतो, त्याच्या निर्मूलनाचेसुद्धा आदेश संबंधित घटकांना द्यावेत, तसेच नदीच्या वरच्या भागात असलेल्या धरणांतून कालबद्धरित्या पाण्याची निर्गत करण्याचे आदेश पाटबंधारे खात्यास द्यावेत, अशी विनंती अ‍ॅड. सुतार यांनी न्यायालयास केली. त्यावेळी योग्य आदेश दिले जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यापूर्वीच कोल्हापूर महापालिका व इचलकरंजी नगरपालिका यांनी प्रदूषण रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाययोजनेची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केली आहे. कागल पंचतारांकित औद्योगिक संस्थेने मात्र, असे प्रतिज्ञापत्र दिलेले नाही. ते आठवड्याच्या आत देण्यास उच्च न्यायालयाने बजावले आहे. महानगरपालिकांनी त्यांच्या भांडवली खर्चाच्या २५ टक्के रक्कम ही प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनांवर खर्च करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांनी दिले असल्याची बाब प्रजासत्ताक सामाजिक संस्थेने न्यायालयासमोर आणली आहे. तथापि, कोल्हापूर महानगरपालिकेला त्यासाठी स्थायी समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे, महासभेच्या निदर्शनास आणून द्यावे लागणार आहे. त्यामुळे या प्रकरणी महापालिका १५ दिवसांनंतर प्रतिज्ञापत्र घालणार आहे.