शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

मोफत वाळू देण्याचा आदेश कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:35 IST

पाच ब्रास वाळूचा तीन वर्षांपूर्वी आदेश संदीप बावचे / जयसिंगपूर : शासन स्तरावर घरकुल योजनेच्या कामांना गती देण्यासाठी प्रयत्न ...

पाच ब्रास वाळूचा तीन वर्षांपूर्वी आदेश

संदीप बावचे / जयसिंगपूर : शासन स्तरावर घरकुल योजनेच्या कामांना गती देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु शिरोळ तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांसाठी लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याचा आदेश तीन वर्षांपासून कागदावरच राहिला आहे. त्याची अंमलबजावणी होत नसल्याने लाभार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

युती सरकारच्या कालावधीत ३ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयाने घरकुल बांधकामासाठी पाच ब्रासपर्यंत वाळू मोफत देण्याची घोषणा करण्यात आली होती; पण महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर वाळूची घोषणा हवेत विरली आहे. त्यातच लॉकडाऊननंतर सिमेंट, सळी यांसह बांधकाम साहित्याच्या दरांत वाढ झाली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याच्या घोषणेमुळे घरकुल बांधकामांना गती येणार आहे, असे वाटत होते. मात्र, शिरोळ तालुक्यातील लाभार्थ्यांना गेल्या तीन वर्षांत एक ब्रासदेखील वाळू मोफत मिळालेली नाही. घरकुल बांधण्यासाठी मिळणारे अनुदान पाहता व बांधकाम साहित्यातील दराची किंमत पाहता फार मोठी तफावत आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानापेक्षा अधिक खर्च लाभार्थ्यांना करावा लागतो.

पंचायत समितीकडून घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्याबाबत तहसील कार्यालयाशी पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. मात्र, वाळू उपलब्ध करून देण्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे सांगण्यात येत असले तरी मोफत वाळू देण्याबाबत प्रशासनाकडून जनजागृतीच झालेली नाही. शासन आदेशाची अंमलबजावणी करून घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लाभार्थ्यांतून होत आहे.

चौकट -

लाभार्थ्यांकडून वाळूला पर्याय

महाआवास अभियानांतर्गत सर्वांसाठी घरे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शासनाकडून लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याबाबत कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे. वाळू मिळत नसल्याने लाभार्थ्यांना पर्याय उपलब्ध करावा लागत आहे. शासनाकडून वाळू उपलब्ध झाल्यास मदत होणार आहे.

(वाळूसाठ्याचे छायाचित्र वापरावे.)