शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्र्यांचा आदेश धाब्यावर

By admin | Updated: July 17, 2014 00:15 IST

थेट पाईपलाईन : विशेष महासभा घेण्याच्या हालचाली सुरू

कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पाईपलाईन योजना मार्गी लावा, असा स्पष्ट दिलेला आदेश धाब्यावर बसवत काही स्थायी सदस्यांनी थेट पाईपलाईनसाठी विशेष सभा घेण्याची तयारी चालविली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत दोन सदस्यांनी पत्रावर सह्या केल्या होत्या. उद्या, गुरुवारपर्यंत विशेष सभेची मागणी करणारे पत्र महापौर सुनीता राऊत यांच्याकडे सुपूर्द होण्याची शक्यता आहे. नेत्यांच्याच आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावून विशेष महासभा घेण्याच्या प्रकाराने महापालिकेतील राजकारणाला भविष्यात कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.निविदा मंजुरी हा स्थायीचा अधिकार असल्याने यामध्ये महापौर किंवा महासभेचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट करून महापौर सुनीता राऊत यांनी आज, बुधवारी सकाळीच स्थायी समिती सभापतींना निविदा पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याची विनंती केली. दरम्यान, चारपेक्षा अधिक स्थायी सदस्यांनी सभा बोलावल्यास ती घ्यावीच लागेल. मात्र, रात्री दहा वाजेपर्यंत कोणतेही पत्र किंवा याबाबत कोणाचाही फोन आलेला नाही, असेही महापौरांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)महासभेत फक्त चर्चायेणाऱ्या महासभेत थेट पाईपलाईनबाबत चर्चा होणार आहे. योजनेबाबतचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. सभेत सदस्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात येईल. योजनेबाबत कोणाच्याही मनात शंका राहू नये, यासाठीच सभेत चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. - शारंगधर देशमुख (कॉँगे्रस गटनेता)दिवसभर घडामोडीमहापालिकेत पाईपलाईनवरून मोठ्या घडामोडी घडल्या. जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रयत्न करूनही विशेष महासभा घेण्याच्या हालचाली सुरूच राहिल्या. आदेश डावलून सभा घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याने नेत्यांचा सभागृहावरील अंकुश कमी झाल्याची चर्चा महापालिकेत आहे.उद्घाटन लांबणीवर पडणारविशेष महासभा होईपर्यंत निविदा प्रक्रिया रखडल्यास याचा परिणाम उद्घाटनावर होणार आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यापूर्वीच थेट पाईपलाईन योजना मार्गी लावल्याखेरीज निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर केले होते. ही योजना मंत्री पाटील यांच्यासाठी ड्रिम प्रोजेक्ट आहे. विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी योजनेचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, निविदा मंजुरीनंतर वर्क आॅर्डर देण्यास पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. यामुळे महापालिकेतील घडामोडींमुळे उद्घाटन प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.