शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाबाबतीत विरोधकांची विधाने प्रक्षोभक व बेजबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:18 IST

कोल्हापूर : मराठा समाजाच्या भावना लवकरात लवकर शासनापर्यंत पोहचाव्यात म्हणून सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मंगळवारी रास्ता रोकोचे आंदोलन ...

कोल्हापूर : मराठा समाजाच्या भावना लवकरात लवकर शासनापर्यंत पोहचाव्यात म्हणून सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मंगळवारी रास्ता रोकोचे आंदोलन केले, पण मोर्चात सहभागी झालेल्या ठरावीक संघटना व विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या विरोधात अत्यंत प्रक्षोभक व बेजबाबदार विधाने केली. वास्तविक महाविकास आघाडी सरकार आरक्षणाच्या बाबतीत आश्वासक पाऊले उचलत असताना आंदोलनादरम्यान ते कसे उदासीन आहे, हे दाखवण्याची ठरावीक पक्ष व संघटनांनी केलेली कृती चुकीची आहे, याचा आम्ही निषेध करतो, राज्य सरकारबरोबर समन्वय ठेवूनच हा प्रश्न सुटेल यासाठी आम्ही आग्रही आहोत, असे स्पष्टीकरण सर्वपक्षीय समितीचे निमंत्रक व शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.

मराठा आरक्षण लढाई लढण्यासाठी स्थापन झालेल्या या समितीत भाजपला पूरक भूमिका घेणारे कार्यकर्तेही आहेत. त्यांनी मोर्चावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी केल्याने चव्हाण यांनी हे स्पष्टीकरण करून खासदार संभाजीराजे व राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. पत्रकात ते म्हणतात, खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची घोषणा करुन सरकारशी समन्वयाची भूमिका राखण्याचा प्रयत्न केला. उपद्रवी लाेकांच्या चिथावणीखोर वक्तव्याने आंदोलनाला गालबोट लागू नये हाच त्या मागचा उद्देश होता. राज्य सरकारच्या अखत्यारित आहेत, तेवढ्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक पाऊले उचलली आहेत. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात लक्ष घालत आहेत. तरीदेखील या प्रक्रियांना अधिक गती यावी म्हणून रास्ता रोकोचे आंदोलन करण्याचे सर्वानुमते ठरले. तथापि तेथे सरकार विरोधी केलेली वक्तव्ये आम्हाला पटलेली नाहीत, ती सरकारवर अविश्वास दाखवणारी व लढ्याचे बळ कमी करणारी असल्याचे लक्षात आल्यानंतरच आम्ही ही भूमिका स्पष्ट करत आहोत. त्यानुसार येथून पुढे देखील सरकारच्या भूमिकेशी सहमत राहून समन्वयाने आणि योग्य संपर्क ठेवूनच हा प्रश्न सुटेल. हे सरकार मराठा समाजाला न्याय मिळवून देईल.