शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीला पाणी देण्यास वारणाकाठच्या गावांचा विरोध

By admin | Updated: June 7, 2016 07:32 IST

आंदोलनाची तयारी : ग्रामपंचायतींना समर्थन देण्याची हाक

आयुब मुल्ला-- खोची --वारणा नदीतून इचलकरंजी शहराला अमृत योजनेतून पाणीपुरवठ्याला विरोध दर्शवण्यासाठी वारणाकाठच्या सर्व गावांतील ग्रामपंचापतींकडे वारणा बचाव युवा कृती समितीने आंदोलनासाठी सहकार्य मागितले आहे. आपली शेती ज्या पाण्यावर अवलंबून आहे ते देऊ नये व आपली विकासाची घडी विस्कटू नये हाच उद्देश त्यामागे आहे.इचलकरंजी शहराला पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा होतो. ती नदी दूषित झाली आहे. यासाठी पर्याय म्हणून लोकप्रतिनिधींनी वारणा नदीतून पाईपलाईनने दानोळी हद्दीतून वारणा नदीच्या पात्रातून इचलकरंजीला पाणी नेण्याचा घाट घातला आहे. त्यास परिसरातील ग्रामस्थांनी सुरुवातीपासून विरोध सुरू केला. पाणी देण्याविरोधात दोनवेळा आंदोलन केले. परिसरातील गावांनीही त्यास प्रतिसाद दिला. आता मात्र त्याची व्याप्ती वाढविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. वारणा बचाव युवा कृती समिती त्यासाठी सक्रिय झाली आहे. समितीने त्यासाठी वारणा काठावरील सर्व गावांच्या ग्रामपंचायतींना निवेदन देऊन आंदोलनास समर्थन देण्याची हाक दिली आहे. यासंदर्भातील हातकणंगले तालुक्यातील सर्व वारणाकाठालगतच्या ग्रामपंचायतींना निवेदन दिले आहे. वारणा नदीवर बांधण्यात आलेले चांदोली धरण वारणा खोऱ्याचा व लाभक्षेत्राचा विकास साधण्याच्या हेतूने बांधण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने काही योजनाही शासनाने करण्याचे सूचित केलेले होते. परंतु त्याची अद्याप शासनाने पूर्तता केलेली नाही. त्याची मुदत सन २०४९ पर्यंत आहे. अशा कारणामुळे धरणात पाणीसाठा नेहमी दिसतो; पण योजना कार्यान्वित झाल्या तर पाण्याचा तुटवडा दिसल्याशिवाय राहणार मग भविष्याचा विचार करता वारणा नदीतून इचलकरंजीला पाणी देणे नुकसानीचे ठरणार आहे, असा प्रबोधनात्मक मुद्दाही समिती गावागावांत भेटीतून मांडत आहे. त्यास प्रतिसाद मिळत आहे. यावरूनच पाणी योजनेला विरोध करण्यासाठी वारणाकाठ सरसावला आहे. त्यासाठी शुक्रवारी (दि. १०) वारणाकाठची गावे बंद राहणार आहेत.