शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

हुपरी नगरपरिषद स्थापनेचा मार्ग मोकळा

By admin | Updated: July 14, 2014 01:11 IST

उच्च न्यायालय : ३१ आॅक्टोबरपर्यंत निर्णय घेण्याचा राज्य शासनाला आदेश

हुपरी : रौप्यनगरी हुपरी (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर करण्यासाठी ३१ आॅक्टोबर २०१४ पर्यंत राज्य शासनाने निर्णय घ्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासनाला बजाविला. त्यामुळे येत्या काही महिन्यांतच येथे नगरपरिषदेची स्थापना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नागरिकांतून समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे. याप्रश्नी अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार निर्मूलन न्यासचे अशोक खाडे यांनी अ‍ॅड़ धैर्यशील सुतार यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याची आज सुनावणी होऊन न्यायालयाने हा आदेश दिला.हुपरी व परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात चालणारा चांदी उद्योग, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, जवाहर साखर कारखाना, व्यंकटेश सूतगिरणीबरोबर अन्य उद्योगांच्या उभारणीमुळे या निमशहरी गावाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. गावची लोकसंख्या सुमारे ५० हजारांवर गेली आहे. सध्या अस्तित्वात असणारी ग्रामपंचायत इतकी लोकसंख्या असणाऱ्या गावाचे व्यवस्थापन करण्यास अपुरी पडत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार व वीज बिल अदा करण्यासाठी महसुलाची रक्कम अपुरी पडत आहे. ग्रामस्थांना नागरी सुविधाही मिळत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी नगरपरिषद होणे अत्यंत गरजेचे आहे. २००७ मध्ये राज्य शासनाने याबाबत उद्घोषणा करून त्यावर हरकती व सूचना मागविल्या होत्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होऊन नगरपरिषद होण्याबाबतची शिफारस त्यावेळीच करण्यात आली आहे. परंतु, गेल्या सात वर्षांत राज्य शासनाने कोणताच निर्णय घेतलेला नाही. परिणामी, ग्रामस्थांना अनेक नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.अशोक खाडे यांनी याप्रश्नी अ‍ॅड.़ धैर्यशील सुतार यांच्यामार्फत मुंबई न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी २७ जूनला होऊन हुपरी ग्रामपंचायतीची नगरपरिषद करण्याचा निर्णय किती दिवसांत घेणार, याची माहिती ११ जुलैपर्यंत देण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने आपल्या वकिलामार्फत आज न्यायालयाला लेखी म्हणणे कळविले. हुपरीच्या ग्रामपंचायतीची नगरपरिषद करण्यासाठीचे प्रशासकीय प्रयत्न सुरू आहेत. काही त्रुटी राहिल्या आहेत. त्यांची पूर्तता करून घेऊन लवकरच नगरपरिषद स्थापन करू, असे आपल्या लेखी म्हणण्यामध्ये राज्य शासनाने म्हटले असल्याची माहिती अ‍ॅड़ सुतार व याचिकाकर्ते खाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (वार्ताहर)