शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

...तरच पुढचा फुटबॉल हंगाम सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:57 IST

कोल्हापूर : चंद्रकांत चषक अंतिम सामना झाल्यावर झालेल्या दगडफेकीनंतर यंदाच्या हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यात पोलीस प्रशासनाने यंदाचा ...

कोल्हापूर : चंद्रकांत चषक अंतिम सामना झाल्यावर झालेल्या दगडफेकीनंतर यंदाच्या हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यात पोलीस प्रशासनाने यंदाचा हंगाम सोडाच; पुढच्या हंगामात फुटबॉल स्पर्धा भरवावयाच्या असतील तर संयोजकांनी अटी व शर्तींची प्रथम पूर्तता स्पर्धेबाबत विचार केली जाईल, अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमींसह खेळाडूंना आता आचारसंहिता पाळल्याशिवाय तरणोपाय राहिला नाही.के. एस. ए.नेही दगडफेकीच्या घटनेबाबत प्रथम मंडळे, फुटबॉल समर्थक यांच्यासाठी आचारसंहिता व्हावी. तिचे पालन, प्रबोधन व्हावे, ही भूमिका घेतली. यासाठी मंगळवारी (दि. ९) के. एस. ए.च्या कार्यालयात फुटबॉल क्षेत्रातील सुमारे ८० हून अधिक आजी-माजी खेळाडू, सोळा संघांचे व्यवस्थापक, पदाधिकारी, आजीवन सभासद, आदींची बैठक बोलाविण्यात येणार आहे. या बैठकीत आदर्श आचारसंहितेवर चर्चा होणार आणि त्यानंतर ती तयार केली जाणार आहे. बहुतांश संघातील खेळाडूंचा सरावालाही मरगळ आल्याचे चित्र आहे. पोलीस प्रशासनानेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा स्पर्धांबाबत कडक धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे यंदाच्या फुटबॉल हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे; तर पुढच्या फुटबॉल हंगामात अटी-शर्तींची प्रथम पूर्तता केल्यानंतरच स्पर्धेला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.पोलीस प्रशासनाच्या अटीपोलीस प्रशासनाने पुढच्या हंगामाकरिता अटी तयार केल्या आहेत. यात प्रत्येक सामन्यात होणारी गर्दी याचा अंदाज संयोजकांनी घेऊन त्याप्रमाणे पोलीस शुल्क भरून बंदोबस्त घ्यावा. यासह प्रेक्षक गॅलरीत पुरेशा प्रमाणात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. मैदानात पुरेसा प्रकाश पडेल अशी प्रकाशयोजना केली पाहिजे. पाण्याच्या बाटल्यांऐवजी प्रत्येक प्रेक्षक गॅलरीत पिण्याच्या पाण्याची सोय केली पाहिजे. प्रवेशद्वारावर तिकीट, कोणतीही वस्तू नाही याची खात्री करण्यासाठी चार सुरक्षारक्षक तैनात केले पाहिजेत, आदी अटींचा समावेश आहे.