शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात एकतर्फी विजय अन् सर्वपक्षीय जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 21:00 IST

कडाक्याचा उष्म्यामुळे तापलेले वातावरण, क्षणाक्षणाला व्हॉटसअपवर मिळणारी मतांची इत्यंभूत माहिती यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी असलेल्या शासकीय गोदाम परिसरातील केंद्राकडे

ठळक मुद्दे एरव्ही कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी हातात ध्वज घेऊन मतदान केंद्राबाहेर निकाल ऐकण्याकरीता जमायचे. परंतु तसे चित्र यावेळी पहायला मिळाले नाही.

कोल्हापूर : कडाक्याचा उष्म्यामुळे तापलेले वातावरण, क्षणाक्षणाला वॉस्अ‍ॅपवर मिळणारी मतांची इत्यंभूत माहिती यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी असलेल्या शासकीय गोदाम परिसरातील केंद्राकडे कार्यकर्त्यांना पाठ फिरवली खरी पण ताराबाई पार्कमधील आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयासमोर आणि रुईकर कॉलनीतील संजय मंडलिक यांच्या निवासस्थानासमोर दुपारनंतर सर्वपक्षीय जल्लोष सुरु झाला.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात चुरशीने मतदान झाल्याचे चित्र होते. अटीतटीची लढत झाल्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपापल्या उमेदवाराच्या विजयावर ठाम होते. त्यामुळे सकाळी जेंव्हा मतमोजणीला सुरवात झाली त्यावेळी कार्यकर्त्यांना काहीशी अस्वस्थता, हुरहुर लागून राहिलेली होती. त्यामुळे सकाळी कार्यकर्ते घरातून बाहेर पडले नव्हते. त्यातच गुरुवारी कमालीचा उष्मा आणि प्रचंड तापलेल्या वातावरणात येण्याचे टाळले. केवळ बंदोबस्तासाठी असलेले पोलिस, कर्मचारी तसेच पत्रकार, छायाचित्रकार यांची उपस्थिती होती. त्यामुळे केंद्राबाहेर गर्दी झालीच नाही. एरव्ही कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी हातात ध्वज घेऊन मतदान केंद्राबाहेर निकाल ऐकण्याकरीता जमायचे. परंतु तसे चित्र यावेळी पहायला मिळाले नाही.पहिल्या तीन चार फेऱ्यात संजय मंडलिक मताधिक्य घेत असल्याचे लक्षात येताच कॉँग्रेस -राष्टवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ठरवून दिलेल्या मेरी वेदर ग्राऊंडवर येण्याचे पूर्णत: टाळले. तर शिवसेनेचे काही कार्यकर्ते पितळी गणपती चौकात तसेच जिल्हा प्रमुख संजय मंडलिक यांच्या घरासमोर जमण्यास सुरवात झाली.

दरवेळेस गाड्यांचे सायलन्सर काढून फिरणारे बाईकवालेही पोलिसांच्या आदेशामुळे दिसले नाही. हा एक मोठा दिलासा सर्वसामान्य जनतेला मिळाला. गुलाल उधळून, ढोलताशा वाजवून विजयाचा जल्लोष साजरा केला पण सायलन्सर काढून गाड्या न फिरवल्याने हा निवडणूक जल्लोष लक्षात राहण्यासारखा राहीला, अशी प्रतिक्रीया काही लोकांनी दिल्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालkolhapur-pcकोल्हापूर