शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्यातील बिबट्याला पकडताना ‘वन’ची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:46 IST

पन्हाळा : पन्हाळगडाच्या पायथ्याशी मंगळवार पेठ ते इब्राहिपूर पेठदरम्यान वाद नावाच्या शेतात गेले तीन ते चार दिवस बिबट्या व ...

पन्हाळा : पन्हाळगडाच्या पायथ्याशी मंगळवार पेठ ते इब्राहिपूर पेठदरम्यान वाद नावाच्या शेतात गेले तीन ते चार दिवस बिबट्या व त्याची दोन पिल्लांचा वावर सुरू आहे. लावलेल्या पिंजऱ्याकडे हा बिबट्या फिरकलाच नसल्याने त्याला जेरबंद करताना वनविभागाची दमछाक होत आहे.पन्हाळा परिसरात मादी बिबट्या आणि दोन पिल्लांचा वावर आहे. या बिबट्याने पन्हाळ््याच्या पायथ्याशी असलेल्या मंगळवार पेठेतील दोन कुत्री नेली. संजय चाचुर्डे यांच्या कुत्र्याला नेताना गावकऱ्यांनी आरडाओरडा केल्यामुळे कुत्र्याला सोडून त्याने पन्हाळगडाच्या तटबंदीच्या दिशेने पळ काढला. बुधवारी मध्यरात्री हा बिबट्या वाद नावाच्या शेतात होता, असे वनविभागाचे कर्मचारी दिलीप वाघवेकर यांनी सांगितले तर रात्री पावणेबाराच्या सुमारास मंगळवार पेठेतील ग्रामस्थांना डरकाळी ऐकू आली. सकाळी वनविभागाला तेथे बिबट्याच्या पायाचे ठसे दिसले.वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन दिवसांपासून परिसरात पिंजरा लावला आहे. मात्र, या पिंजºयाकडे तो फिरकलाच नाही. गुरुवारी पन्हाळगडाच्या पश्चिमेस असणाºया इंजोळे गावातील जयसिंग पाटील यांनी मसाई पठारच्या तटबंदीच्या जंगलात बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे मंगळवार पेठ येथील बिबट्या या भागात स्थलांतर झाला आहे की इंजोळे भागात आणखी एका बिबट्याचा वावर वाढला आहे याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी पावनगड येथील जंगलात रहिवाशांनाही बिबट्याचे दर्शन झाले होते. एकूणच पन्हाळगडाचा परिसर बिबट्याच्या दहशतीखाली आला आहे.