शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘फुलेवाडी’ची ‘शिवनेरी’वर एकतर्फी मात

By admin | Updated: December 12, 2014 00:35 IST

‘केएसए’ लीग फुटबॉल सामने : दिलबहार ‘ब’चा पाटाकडील ‘ब’वर निसटता विजय

कोल्हापूर : के. एस. ए. लीग फुटबॉल सामन्यात आज, गुरुवारी फुलेवाडी क्रीडा मंडळाने शिवनेरीचा ४-२ असा धुव्वा उडविला; तर दिलबहार ‘ब’ने पाटाकडील ‘ब’ वर १-० असा निसटता विजय मिळविला.छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर्धेत पहिला सामना फुलेवाडी क्रीडा मंडळ विरुद्ध शिवनेरी स्पोर्टस यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासून फुलेवाडीच्या राजादास, अरुणशू गुप्ता, मंगेश दिवसे, अनिकेत जाधव, रोहित मंडलिक, मोहित मंडलिक, अजित पोवार यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. दहाव्या मिनिटाला ‘शिवनेरी’च्या खेळाडूच्या हाताला बॉल लागल्याने पंचांनी फुलेवाडीला पेनल्टी बहाल केली. या पेनल्टीवर फुलेवाडीकडून राजादास याने गोल नोंदवीत १-० अशी आघाडी मिळवून दिली. १६ व्या मिनिटाला अरुणशू गुप्ता याने मैदानी गोल नोंदवीत ही आघाडी २-० केली. पुन्हा १८ व्या मिनिटाला अरुणशू गुप्ता याने वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल नोंदवीत आपल्या संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात शिवनेरी संघाने सामन्यात बरोबरी करण्यासाठी वेगवान चाली रचल्या. ५५ व्या मिनिटाला सूरज जाधव याने दिलेल्या पासवर इस्टिरिसो याने गोल नोंदवीत ३-१ ने आघाडी कमी केली. ५९ व्या मिनिटाला इस्टिरिसोने दिलेल्या पासवर सूरज जाधव याने गोल नोंदवीत आघाडी ३-२ अशी कमी केली. या दरम्यान शिवनेरीकडून दीपराज राऊत, सूरज जाधव यांनी खोलवर चढाया केल्या. फुलेवाडीचा गोलरक्षक निखिल खाडे याने त्या परतावून लावल्या. ६९ व्या मिनिटाला फुलेवाडीच्या सूरज शिंगटेने गोल नोंदवीत ४-२ अशी आघाडी वाढविली. अखेरपर्यंत शिवनेरीकडून वेगवान चाली रचून सामन्यात कमबॅक करण्याचे आटोकाट प्रयत्न झाले. मात्र, सजग फुलेवाडी बचावफळीकडून ते निष्प्रभ ठरविण्यात आले. हा सामना फुलेवाडीने ४-२ अशा गोलफरकाने जिंकला.दुसरा सामना पाटाकडील ‘ब’ विरुद्ध दिलबहार ‘ब’ यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांनी वेगवान व आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. पाटाकडील ‘ब’कडून राजेंद्र काशीद, संग्राम शिंदे, श्रीनिवास नारंगीकर, सूरज हकीम यांनी, तर दिलबहार ‘ब’कडून आदित्य माने, शशांक माने, निखिल कुलकर्णी, स्वप्निल साळोखे यांनी खोलवर चढाया केल्या. २३ व्या मिनिटाला दिलबहार ‘ब’च्या निखिल आहेर याने गोल करीत १-० अशी आपल्या संघास आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात पाटाकडील ‘ब’कडून सामना बरोबरीत आणण्यासाठी वेगवान व खोलवर चढाया केल्या. मात्र, दिलबहार ‘ब’च्या बचावफळीकडून त्या निष्प्रभ ठरविण्यात आल्या. अखेरपर्यंत सामन्यात बरोबरी साधण्यासाठी पाटाकडील ‘ब’कडून शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, दिलबहार ‘ब’च्या निखिल आहेरच्या एकमेव गोलवर हा सामना जिंकला. (प्रतिनिधी)