पोपट पाटील हे साजणी येथील त्यांच्या शेतात ऊस पिकास पाणी लावून सोमवारी रात्री घरी परत आले होते. दरम्यान, ऊस पिकाने पाणी किती घेतले आहे हे पाहण्यासाठी मंगळवार, ११ रोजी पहाटे साडेचार वाजता परत शेताकडे गेले असता त्यांच्या शेतातून गेलेल्या ११ हजार होल्टच्या लोंबकळत्या विद्युत तारेस स्पर्श होऊन त्यांचा जागीच मृत्यृ झाला. त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य पाटील हे घरी लवकर का आले नाहीत, हे पाहण्यासाठी शेतात गेले असता सदरची घटना उघडकीस आली. पोपट पाटील हे लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत एका खाजगी कंपनीत नोकरीस होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे.
विजेच्या तारेस स्पर्श होऊन साजणी येथे एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST