शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सायकल चोरल्याच्या संशयावरून बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:26 IST

इचलकरंजी : यड्राव (ता.शिरोळ) येथील पार्वती औद्योगिक वसाहतीच्या समोर असलेल्या ढाब्याजवळ सायकल चोरल्याच्या संशयावरून केलेल्या बेदम मारहाणीत एकाचा जागीच ...

इचलकरंजी : यड्राव (ता.शिरोळ) येथील पार्वती औद्योगिक वसाहतीच्या समोर असलेल्या ढाब्याजवळ सायकल चोरल्याच्या संशयावरून केलेल्या बेदम मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू झाला. अलीम गजवाल (वय ४५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अल्ताफ शेख (रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) या यंत्रमाग कारखानदारास शहापूर पोलिसांनी अटक केली.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गत आठवड्यात अल्ताफ शेख याची सायकल चोरीला गेली. त्याने परिसरात शोध घेऊनही त्याला सायकल सापडली नाही. चौकशीमध्ये अलीम गजवाल याने सायकल चोरून विकल्याची माहिती अल्ताफ याला समजली. यामुळे त्याने अलीम याच्याकडे सोमवारी (दि. १५) रात्री विचारणा केली. त्यावेळी अलीम हा मद्यधुंद अवस्थेत होता. उडवाउडवीची उत्तरे मिळू लागल्याने संतप्त झालेल्या अल्ताफ याने अलीमला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अलीमचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.

मंगळवारी पहाटे ४५ वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांना प्राथमिक चौकशीत अलीम व अल्ताफ यांच्यात वाद झाल्याचे समजले. पोलिसांना माहिती मिळाल्याचे समजताच अल्ताफ याने पलायन केले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली.