फलटण : गुटखा विक्रीच्या प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या खुदाबक्ष महात (वय ४५, रा. विद्यानगर) यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. ही घटना आज (शुकवार) रात्री उशिरा घडली. घटनेची माहिती समजताच पाचशेजणांचा जमाव पोलीस ठाण्यासमोर जमा झाला होता. याप्रकरणी दोषींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेऊन मृतदेह पोलीस ठाण्यासमोरच ठेवला होता. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. गृहरक्षक दल (एसआरपी)ची कुमक दाखल झाली आहे. (प्रतिनिधी)
फलटण पोलीस ठाण्यात एकाचा मृत्यू
By admin | Updated: May 3, 2014 17:03 IST