लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी दलित तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. आरोपी भाऊ दत्तात्रय खाडे (रा. कासारपुतळे ता. राधानगरी) याच्याविरोधात संबंधित तरुणीने राधानगरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पीडित तरुणी कासारपुतळे येथे देवदर्शनासाठी जात असताना आरोपीची ओळख झाली होती. त्याने या पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. तिला त्रास होऊ लागल्याने सीपीआर हॉस्पिटल उपचार सुरू असताना तिने तेथे फिर्याद दिली होती. हा गुन्हा वर्ग झाल्यावर पोलिसांनी तपास करून आरोपीस अटक केली आहे.
बलात्कारप्रकरणी कासारपुतळे येथील एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:20 IST