शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखाचा गुटखा, तंबाखू जप्त

By admin | Updated: July 1, 2016 00:34 IST

इचलकरंजीत कारवाई : एकास अटक; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी : अवैध गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या चालकास टेम्पोसह येथील गावभाग पोलिस ठाण्याच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री पकडले. या कारवाईत टेम्पोसह चार लाख ५८ हजार रुपयांचा तंबाखू आणि गुटख्याचा साठा जप्त केला. याप्रकरणी श्रीशैल सदाशिव वाळवेकर (वय २२, रा. खंजिरे मळा) याला अटक केली आहे. अन्न व औषध विभागाच्यावतीने पंचनामा करून गावभाग पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बुधवारी रात्रीच्या सुमारास येथील जिल्हा सत्र न्यायालयासमोर श्रीशैल वाळवेकर याला टेम्पोमधून जात असताना गावभाग पोलिस ठाण्याच्या गस्ती पथकाने संशयावरून थांबविले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता गाडीमध्ये पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांना यासंदर्भात माहिती दिली. अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने अन्नसुरक्षा अधिकारी ए. बी. कोळी व ए. जे. टोणपे या दोघांनी गुरुवारी गावभाग पोलिस ठाण्यात येऊन जप्त केलेल्या मालाची तपासणी केली. त्यामध्ये गाडीत एक लाख ५८ हजार रुपयांचा विविध कंपन्यांचा पानमसाला व गुटखा असा मुद्देमाल आढळला. (वार्ताहर)अन्न व औषध प्रशासनाकडे मनुष्यबळच नाहीशासनाने प्रतिबंध केला असला तरी गल्लोगल्ली गुटख्याची विक्री राजरोसपणे सुरू असते. गुटखा खाणाऱ्यांना सहजपणे तो उपलब्ध होतो. यावर नियंत्रण ठेवणे अथवा कारवाई करणे अन्न व औषध प्रशासनाला शक्य नाही. कारण तालुक्याला इन्स्पेक्टरची आवश्यकता असताना सध्या जिल्ह्यासाठी आठ इन्स्पेक्टर आहेत. मात्र, त्यातील चारच कार्यरत आहेत. या चार व्यक्तींमार्फत जिल्ह्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे.वेळकाढू प्रक्रियापोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा पकडून अन्न व औषध प्रशासन विभागाकडे वर्ग केला असला तरी हा गुटखा शासनाने प्रतिबंध केलेल्या नियमानुसार प्रतिबंधित आहे का? याबाबत तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेकडे पाठविला जातो. तेथून कमीत कमी सहा महिने ते जास्तीत जास्त दोन वर्षांच्या कालावधीनंतर त्याचा अहवाल प्राप्त होतो, अशी वेळकाढूपणाची शासकीय प्रक्रिया असल्याने आरोपी सुटून जातात.