शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यात सव्वा लाख वाहने फास्टॅगविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST

कोल्हापूर : गेल्या दीड महिन्यात किणी टोलनाक्यावरून १ लाख १८ हजार ७५१, तर तासवडे टोलनाक्यावरून १ लाख २९ हजार ...

कोल्हापूर : गेल्या दीड महिन्यात किणी टोलनाक्यावरून १ लाख १८ हजार ७५१, तर तासवडे टोलनाक्यावरून १ लाख २९ हजार २२९ वाहने रोख मार्गिका अर्थात फास्टॅगविना गेली आहेत. या टोलनाक्यावर मध्यरात्रीपासून तीन मार्गिका फास्टॅग, तर एक हायब्रिड मार्गिका सुरु झाली आहे. ज्या वाहनांना फास्टॅग नसेल, त्यांना मध्यरात्रीपासून दुप्पट टोल आकारला जाणार आहे.

केंद्र सरकारने देशातील सर्व टोलनाक्यांवरून जा-ये करणाऱ्या चारचाकी वाहनांना टोल भरणा रोखीऐवजी फास्टॅगच्या माध्यमातून ई-पेमेंट भरणा करणे बंधनकारक केले आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रथम ३१ डिसेंबर २०२० ही तारीख निश्चित केली होती. सर्वच ठिकाणी लाखो वाहनधारकांनी हे फास्टॅग कोड घेतले नव्हते. या कारणावास्तव १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ केंद्र शासनाने दिली होती. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीपासून टोल नाक्यांवर फास्टॅग कोड स्टीकर नसेल तर त्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कोल्हापूर विभागांतर्गत किणी टोलनाक्यावरून रोज १९ हजार ६४७ वाहने ये-जा करतात. त्यापैकी १५ हजार ७४२ वाहने फास्टॅग, तर ३ हजार ९०५ वाहने विना फास्टॅग अर्थात रोख टोल भरून जात होती. अशीच परिस्थिती तासवडे टोलनाक्यावरही आहे. यात अनुक्रमे रोज २१ हजार ७६० वाहने ये-जा करतात. त्यापैकी १७ हजार ७६९ वाहने फास्टॅगद्वारे, तर ३ हजार ९९१ वाहने विना फास्टॅग जात होती. सोमवारी मध्यरात्रीपासून या दोन्ही टोलनाक्यांवरील मार्गिकांमधील तीन मार्गिका पूर्णपणे फास्टॅग, तर एक मार्गिका हायब्रीड अर्थात रोख आणि फास्टॅग अशी केली आहे. जे टोल रोख भरतील त्यांना दुप्पट टोल आकारला जाणार आहे.

चौकट

दीड महिन्यातील स्थिती अशी,

टोलनाका फास्टॅग ई-पेमेंट रोखीत भरणा (फास्टॅगविना)

किणी (वाहन संख्या ५ लाख ७३ हजार २४६ ६ हजार ६४ १ लाख १८ हजार ७५१

तासवडे (वाहन संख्या) ६ लाख ४१ हजार ४१८ ६ हजार १३९ १ लाख २९ हजार ५५०

कोट

मध्यरात्रीपासून किणी व तासवडे टोलनाक्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना फास्टॅग अनिवार्य केला आहे. ज्या वाहनांनी फास्टॅग काढला नसेल त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. त्याकरिता तीन लेन फास्टॅग, तर एक लेन हायब्रीड केली आहे.

- चंद्रकांत बर्डे, नोडल अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण