शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पेठ वडगावला दीड, हातकणंगलेला एक कोटीचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : कोरोनाच्या काळातदेखील वडगाव नगरपालिकेस रस्ता अनुदानातून दीड कोटीचा निधीचा शासनाने दिला आहे. वडगाव शहराच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : कोरोनाच्या काळातदेखील वडगाव नगरपालिकेस रस्ता अनुदानातून दीड कोटीचा निधीचा शासनाने दिला आहे. वडगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असून, परिस्थिती सुधारताच आणखी निधी आणण्यात येईल, अशी माहिती आमदार राजू आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आमदार आवळे म्हणाले, वडगावात प्रत्येक प्रभागात रस्ते झाले पाहिजेत अशा सूचना नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांना दिल्या होत्या.

वडगाव शहरासाठी आमदार निधीचा पहिलाच २५ लाखांचा निधी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणासाठी दिलेला आहे. त्यानंतर शहरासाठी वर्षभरात एक कोटी ९० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

शासनाकडून अडीच कोटी रुपये रस्ता अनुदानासाठी दिले होते. यातील वडगाव, हातकणंगलेला जास्तीत जास्त निधी मिळावा अशी मागणी केली होती. त्यानुसार वडगाव पालिकेस दीड, तर हातकणंगले पालिकेस एक कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

वडगाव पालिकेस निधीसाठी गटनेत्या प्रविता सालपे, विरोधी पक्षनेत्या विद्या पोळ, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, अजय थोरात, आदींसह कार्यकर्ते यांनी पाठपुरावा केला.

या निधीतून शहराअंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे; तर यादव काॅलनी ते बबन जाधव घर यथे आरसीसी गटारी करण्यात येणार आहे.

तालुक्यात बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात कोविड रुग्णांची सोय करण्यात आली होती; पण वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अतिग्रे येथील संजय घोडावत कॅम्पस येथे ३५० बेड व ९० ऑक्सिजन बेडचे रुग्णालय सुरू केले आहेत. त्यामुळे रुग्णांवर तातडीने योग्य उपचार होण्यास मदत होणार आहे. सेवाक्षेत्रात कार्यरत लोकांपासून संसर्ग रोखण्यासाठी मतदार संघात ॲंटिजिन टेस्ट करण्याचे नियोजन केले आहे.