शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

‘त्या’ वृध्देला अखेर घर मिळाले

By admin | Updated: November 19, 2014 23:22 IST

रिक्षाचालकांचा आधार : मुलाने घरी नेले==लोकमत प्रभाव

सांगली : येथील राममंदिर कॉर्नरवरील रिक्षा थांब्यावर गेल्या सात दिवसांपासून बेवारस स्थितीत राहिलेल्या वृद्ध महिलेला अखेर घर मिळाले. ‘लोकमत’मध्ये आलेले वृत्त वाचून तिच्या मुलाने आज (बुधवार) सकाळी तिला घरी बोलावून नेले. सात दिवसांपूर्वी या वृद्धेला तिचा मुलगा एका रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन आला होता. मुलाने तिला राममंदिर कॉर्नरवर सोडले आणि त्याने ‘आई तू इथंच थांब, मी लगेच आलो’, असे सांगून तो निघून गेला, असे ही वृद्धा सांगत होती. एक-दोन दिवस होऊन गेले तरी कोणीच न आल्याने रिक्षावाल्यांनी वृद्धेला आधार दिला. तिच्या चहा-पाणी व जेवणाचीही सोय केली. थंडीचे दिवस असल्याने तिला पांघरण्यासाठी नवीन चादर खरेदी करून दिली होती. तुळशीराम खरात या चहावाल्याने तिला रोजचा चहा, नाष्टा दिला, तर राम मंदिर रिक्षा स्टॉपच्या सर्व चालकांनी तिच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती. याचे वृत्त आज ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झाले. त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास या वृध्देचा अंदाजे ५० वर्षाच्या मुलाने रिक्षा स्टॉप गाठला. आई हरवली होती, आम्ही तिचा सर्वत्र शोध घेऊन मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. आज ‘लोकमत’मधील बातमी वाचून तिला नेण्यासाठी आलो असल्याचे त्याने रिक्षाचालकांना सांगितले. सुरुवातीला वृध्देने त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला; मात्र मुलाने रडून तिची माफी मागितल्यानंतर वृध्दा त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली. अखेर रिक्षाचालकांचे आभार मानून त्याने तिला घरी नेले. (प्रतिनिधी)‘लोकमत’मध्ये आज वृत्त प्रसिध्द झाले. त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास या वृध्देचा अंदाजे ५० वर्षाच्या मुलाने रिक्षा स्टॉप गाठला. आई हरवली होती, ‘लोकमत’मधील बातमी वाचून तिला नेण्यासाठी आलो असल्याचे त्याने रिक्षाचालकांना सांगितले.