शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींनो, आता फडणवीस यांच्या फसवणुकीला तयार राहा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST

विक्रम ढोणे यांची टीका लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेवून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवे ...

विक्रम ढोणे यांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेवून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवे आश्वासन दिले आहे. त्यांचा आवेश पाहता ओबीसी बांधवांनी नव्या फसवणुकीला तयार राहावे, असा इशारा धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी रविवारी येथे दिला.

ढोणे यांनी पत्रकात म्हटले आहे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खोटे बोलण्यात कोणी हात धरू शकणार नाही. त्यांनी सात वर्षांपूर्वी धनगर समाजाला १५ दिवसांत अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचे आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात आरक्षण मिळणारच नाही, याची व्यवस्था केली, शिवाय बुद्धिभेद करून धनगर समाजाच्या राजकीय जागृतीची चळवळ संपवली. फडणवीसांच्या आश्वासनाला धनगर समाज ज्याप्रमाणे भुलला, त्याप्रमाणे ओबीसी समाजाने भुलून जाऊन नये.

भाजप ओबीसींचा कळवळा घेऊन आंदोलन करत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या हातात सत्ता द्या, चार महिन्यांत ओबीसीचे आरक्षण मिळवून देतो, नाही मिळवून दिले तर राजकीय संन्यास घेईन, अशी घोषणा केली आहे. फडणवीस यांनी २०१४ साली विधानसभा निवडणुकांच्यापुर्वी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण देतो, असे सांगितले. त्यांतर फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री झाल्यावर नागपूर मेळाव्यात पंधरा दिवसांत आरक्षण देण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात आरक्षण दिले नाही, उलट आरक्षण मिळूच नये, यासाठी टिस संस्थेकडून सर्वेक्षण केले. धनगर समाजात दलाल निर्माण करून समाजाचा बुद्धिभेद केला. आरक्षण आणि योजना यातील फरकही समाजाला कळू दिला नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाला सातत्याने विरोध करणाऱ्या नेत्यांना महाराष्ट्राचे आदर्श नेते म्हणत भाजपमध्ये घेतले. धनगर समाजाची राजकीय जागृतीची चळवळ संपून जावी, यासाठी षडयंत्र केले. धनगर समाजाचे खच्चीकरण करण्यात ते यशस्वी झाले. तेच फडणवीस आता ओबीसींसाठी राजकीय संन्यासाची भाषा करत आहेत, हा मोठा विनोद आहे, असे ढोणे यांनी म्हटले आहे.