शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

त्या ‘नकुशी’चा मृत्यू

By admin | Updated: July 11, 2016 01:09 IST

खासगी रुग्णालयात दोन महिने सुरू होते उपचार

कोल्हापूर : मे महिन्यात गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील एका बोळामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत सापडलेल्या ‘त्या’ नकुशीचा शनिवारी सायंकाळी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. विचारे माळ येथील हसीना सय्यद यांना दोन मुलींनंतर तिसरा मुलगा झाला, चौथी मुलगी झाली आणि पाचवाही मुलगाच होईल, अशी आशा होती; परंतु, मुलगी झाल्याने तिचा सांभाळ आपला भाऊ करील, म्हणून त्यांनी त्या ‘नकुशी’ला भावाच्या दारातच सोडून दिले होते. तिच्या मृत्यूमुळे दुरान्वयाने का होईना, ‘ती’ माताच तिची वैरिण ठरली. मे महिन्यात गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील एका बोळामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत दोन दिवसांची नवजात बालिका सापडली. याबाबत पोलिसांनी तपास करून हसीना आणि रशीद सय्यद या तिच्या आई-वडिलांचा छडा लावला, त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी मुलगी झाली म्हणून हसीना हिने ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील आपला भाऊ सलीम शेख याच्या दारात प्लास्टिक पिशवीमध्ये दोन दिवसांच्या नवजात बालिकेला ठेवल्याची कबुली दिली होती. तिच्यावर प्रथम छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालय येथे उपचार सुरू होते. तिथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बालकल्याण समितीने तिचा ताबा जरगनगरातील डॉ. प्रमिला जरग यांच्या शिशू आधार केंद्राकडे दिला होता. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, ती ‘नकुशी’ जरगनगरातील शिशू आधार केंद्रात ती रमली होती. मात्र, तिची प्रकृती पुन्हा बिघडल्याने तिला पुन्हा ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आल्याचे समजले. ‘सीपीआर’मध्येही उपचार सुरू असताना तिची तब्येत आणखीनच खालावल्याने तिला पुन्हा एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र, शनिवारी उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या बालिकेवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे समजले असल्याची माहिती बालकल्याण समितीच्या अध्यक्षा प्रिया चोरगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लोकमतला दिली. (प्रतिनिधी)