शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची मदार आता शिवसेनेच्या भूमिकेवर

By admin | Updated: March 5, 2017 00:13 IST

जिल्हा परिषद सत्तेचे राजकारण : ‘युवक क्रांती’चे सदस्य सहलीवर

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने सावध मोर्चेबांधणी केली असली, तरी युवक क्रांतीच्या दोन सदस्यांना भाजप नेत्यांनी सहलीवर पाठविल्याने दोन्ही कॉँग्रेससमोर पेच निर्माण होऊ शकतो. दोन्ही कॉँग्रेसची सत्तेची मदार आता केवळ आणि केवळ शिवसेनेच्या भूमिकेवर राहणार आहे. जिल्हा परिषदेचा निकाल लागून दहा दिवस झाले आहेत, पण सत्तेचा लंबक रोज इकडून तिकडे झुकत असल्याने सत्तेबाबत कमालीची उत्कंठा लागली आहे. निकालाच्या दिवसापासून कॉँग्रेसने सत्तेसाठी सर्व फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूने भाजपनेही महापालिकेतील अनुभव उराशी बांधून आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते सत्ता आमचीच येणार असे जरी सांगत असले, तरी त्यांना सत्तेची मॅजिक फिगर ‘३४’पर्यंत पोहोचता आलेले नाही. दोन्ही काँग्रेसचे २५ सदस्य आहेत. प्रकाश आवाडे यांच्या गटाचे दोन सदस्य, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन, आमदार प्रकाश आबिटकर यांच्या ‘शाहू आघाडी’चे दोन व अपक्ष रसिका अमृत पाटील असे सात सदस्य आपल्या बाजूने असल्याचा दावा कॉँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे; पण यापैकी कोणीही उघडपणे पाठिंबा जाहीर केलेला नाही. या सगळ्यांनी पाठिंबा दिला तरी दोन सदस्य कमी पडतात. चंदगडच्या युवक क्रांतीचे दोन सदस्य आपल्याबरोबर राहतील, असे दोन्ही कॉँग्रेसला वाटत होते. या सदस्यांचा निर्णय डॉ. नंदिनी बाभूळकर व गोपाळराव पाटील घेणार असले, तरी तोपर्यंत कोणतीही जोखीम नको म्हणून सदस्यांना सहलीवर पाठविले आहे. युवक क्रांती भाजपसोबत राहिली तर ‘भाजता’चे संख्याबळ २५ पर्यंत पोहोचते. सत्तेसाठी दोन्ही कॉँग्रेसला दोन, तर ‘भाजता’ला दहा सदस्य कमी पडतात. हे दहा सदस्य शिवसेनेचे आहेत. मुंबई महापालिकेतील सत्तासंघर्षात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काहीशी सामंजस्याची भूमिका घेतल्याने तेथील सत्तेचा तिढा सुटण्याची आशा भाजप नेत्यांना आहे. तिथे शिवसेना-भाजप एकत्र आली तर कोल्हापुरात एकत्र येण्यास काही हरकत राहणार नाही. निकालाच्या दिवसापासून कॉँग्रेसने सत्तेसाठी सर्व फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूने भाजपनेही महापालिकेतील अनुभव उराशी बांधून आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत.