शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आता सामना डेंग्यू, चिकुनगुनियाशी, साडेचार हजार घरात तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कोरोनासारख्या महामारीशी सामना करीत असलेल्या महानगरपालिका आरोग्य विभागाने आता शहरा डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ पसरू नये म्हणून ...

कोल्हापूर : कोरोनासारख्या महामारीशी सामना करीत असलेल्या महानगरपालिका आरोग्य विभागाने आता शहरा डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ पसरू नये म्हणून विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. कीटकनाशक विभागाकडून दैनंदिन औषध फवारणी, धूर फवारणीबरोबरच घराघरात जाऊन डास अळी तसेच कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे.

प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण शहरात आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. गुरुवारी शहरातील १४ प्रभागातील ४४३१ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ६,८२६ कंटेनर तपासण्यात आले. यामध्ये डेंग्यूसदृश २०३ ठिकाणी डास अळी आढळून आल्या. यावेळी दूषित पाणी आढळलेल्या ठिकाणी ठिकाणी तत्काळ औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात आली.

शहरातील औषध फवारणीसाठी ५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने २८ स्प्रे पंप, १४ धुर फवारणी मशीनद्वारे ही मोहीम राबविण्यात आली. सर्वेक्षणात दूषित पाण्याच्या ठिकाणी असलेल्या टायरी जप्त करून पाण्याच्या ठिकाणी गप्पी मासे कर्मचाऱ्यांमार्फत सोडण्यात आले. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, सर्व वॉर्ड आरोग्य निरीक्षक, मुकादम व कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील नागरिकांनी डेंग्यू, चिकुनगुनियाची लक्षणे आढळल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागास अथवा शासकीय रुग्णालयाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

-काय खबरदारी घ्यावी-

- सेप्टिक टँकच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी

- आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळवा

- फ्रिजमधील डिफ्रॉस स्ट्रेमधील पाणी आठ दिवसातून एकदा रिकामे करावे

- घराजवळील रिकामे टायर, नारळाच्या करवंट्या, डबे इत्यादीमध्ये पाणी साचू देऊ नये