शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

‘जोतिबा’ आराखड्याचे आता अंतिम सादरीकरण

By admin | Updated: March 11, 2017 23:34 IST

मुख्यमंत्र्यांबरोबर मंगळवारी बैठक : वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा

कोल्हापूर : जोतिबा परिसर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील २५ कोटींच्या निधीच्या मान्यतेसाठी मंगळवारी (दि. १४) मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आराखडा सादर केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांसमोर जाताना आराखड्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत, याची काळजी घेऊया, अशा सूचना दिल्या. सादरीकरणावेळी संबंधित विभागांनी काय करायचे, कोणते मुद्दे मांडायचे, यावर चर्चा झाली. जोतिबा विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळणार आहे. त्याच्या अंतिम मंजुरीसाठी मंगळवारी (दि. १४) सकाळी ११ वाजता मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून, यावेळी हा आराखडा सादर केला जाणार आहे. त्यावेळी आराखड्यासंदर्भात नेमके काय सादरीकरण करायचे, कोणते मुद्दे मांडायचे यावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जोतिबा परिसरासाठी १५५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यातील २५ कोटी रुपयांचा पहिल्या टप्प्यातील आराखडा राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीला सादर करण्यात आला होता. या समितीने यामध्ये बदल सुचवून आणखी काही कामे समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार बैठकीत चर्चा झाली. आराखडा अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे तो परिपूर्ण असावा, त्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत याची प्रत्येक विभागाने काळजी घेतली पाहिजे. त्यानुसार संबंधितांना सूचना देण्यात आल्या. सादरीकरण करताना कोणते मुद्दे मांडायचे, त्यातील कोणत्या ठळक मुद्द्यांवर भर द्यायचा, यावर चर्चा करण्यात आली. हा आराखडा तांत्रिकदृष्ट्या भक्कम करण्यात आला असून, त्याला अंतिम मान्यता मिळण्यास काहीच अडचण नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.भूमिगत विद्युततारा, यात्री भवन समाविष्टमुख्य सचिवांच्या समितीने आराखड्यात बदल करून काही कामे नव्याने समाविष्ट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार राजू शेट्टी यांनी जोतिबाच्या सासनकाठीच्या मार्गावर असलेल्या विद्युततारांचा अडथळा असून त्यावर पर्याय काढण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने या विद्युततारा भूमिगत केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर जोतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांच्या निवासासाठी यात्री भवन उभारण्यात येणार आहे. ही दोन कामे या आराखड्यात नव्याने समाविष्ट केली आहेत.