शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

ऊसदरासाठी आता शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर

By admin | Updated: December 11, 2014 00:33 IST

उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : उसाला प्रतिटन ३५०० रुपयांची मागणी

कोल्हापूर : चालू गळीत हंगाम सुरू होऊन महिना उलटला तरी साखर कारखान्यांनी आपली ‘एफआरपी’ जाहीर केलेली नाही. ती जाहीर करून एकरकमी द्यावी, उसाला प्रतिटन ३५०० रुपये भाव मिळालाच पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. १२) शेतकरी कामगार पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे राज्य सहसरचिटणीस व माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.टेंबे रोडवरील पक्षाच्या कार्यालयापासून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. बिंदू चौक, छत्रपती शाहू महाराज पुतळा, स्टेशन रोड, बसंत-बहार टॉकीजमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे येणार आहे. या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले जाईल, असे पवार-पाटील यांनी सांगितले.पवार-पाटील म्हणाले, ऊस गाळप केल्यानंतर १४ दिवसांत ‘एफआरपी’ची रक्कम शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असून, काही कारखाने हे बंधन पाळत नाहीत. मुळातच वाढत्या महागाईच्या प्रमाणात वाढणारा उत्पादन खर्च विचारात घेता शासनाने जाहीर केलेली ‘एफआरपी’ शेतकऱ्यांना न परवडणारी आहे. जाहीर झालेली ‘एफआरपी’ शेतकऱ्यांना एकरकमी मिळणे आवश्यक आहे. गेल्या तीन-चार वर्षांत शासनाने ‘एफआरपी’चे सूत्र स्वीकारल्यापासून ही रक्कम तीन-चार टप्प्यांत देऊन ‘एफआरपी’ म्हणजेच अंतिम दर अशीच भूमिका शासन व साखर कारखानदारांनी घेतली आहे. बाजारातील सर्व वस्तूंचे वाढणारे भाव, त्यामुळे शेतकऱ्यांचे महागडे बनलेले जीवन, वाढणारा उत्पादन खर्च, याचा ‘एफआरपी’ जाहीर करताना विचारच झालेला नाही. ती ठरविताना महागाईच्या निर्देशांकाचा विचार करून त्या प्रमाणात ठरविणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य सरकारने साखर उद्योगाबद्दल अस्थिर व अनिश्चित धोरण न स्वीकारता उसाचा दर कारखान्यांच्या मर्जीवर व साखरेच्या बाजारातील किमतीवर न ठेवता त्यासाठी दीर्घकालीन शाश्वत धोरण स्वीकारणे गरजेचे आहे.यावेळी जिल्हा सहचिटणीस भारत पाटील, बाबासाहेब देवकर, मधुकर हरेल, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मागण्या अशा...उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर मिळालाच पाहिजेजाहीर झालेली ‘एफआरपी’ एकरकमी दिली पाहिजेगूळ खरेदी-विक्रीचा व्यवहार बाजार ामित्यांमार्फतच झाला पाहिजेसरकारने गुळावरील उठविलेले नियमन रद्द करावेदुधाचे दर वाढवून मिळावेत व दूध भुकटीस निर्यात अनुदान देऊन निर्यात वाढवावीभात व इतर भरडधान्य सोयाबीन, काजूची शासनामार्फत खरेदी केंद्रे संबंधित भागातील प्रमुख गावांत सुरू करावीत