शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आता शेतकरी करणार पीक पेरणीच्या नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:28 IST

आयुब मुल्ला लोकमत न्यूज नेटवर्क, खोची : स्वतःच्या शेतातील पीक पेरणीची माहिती शेतकऱ्यांनी स्वतः भरावी त्यातून अचूकता निर्माण व्हावी ...

आयुब मुल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क, खोची : स्वतःच्या शेतातील पीक पेरणीची माहिती शेतकऱ्यांनी स्वतः भरावी त्यातून अचूकता निर्माण व्हावी या उद्देशाने शासनाने राज्यात ई-पीक पाहणी हा उपक्रम हाती घेतला आहे. १५ ऑगस्टपासून हा कार्यक्रम राज्यातील गावागावांत राबविण्यात येणार आहे. यासाठी अँड्रॉइड मोबाइलचा वापर शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. सध्या या पार्श्वभूमीवर ई-पीक पाहणी प्रबोधन सप्ताह सुरू आहे.

या उपक्रमामुळे पीक पेरणी अहवालात शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सक्रिय सहभाग वाढणार आहे. याचा प्रचार ,प्रसिद्धी करण्याचे काम कृषी विभाग करीत आहे,ल तसेच त्यावर नियंत्रण ठेवणे, त्याची जबाबदारी अचूक पार पाडणे यासाठी महसूल विभाग कार्यरत आहे.

पीक पेरणीची माहिती भरण्यासाठी शेतकऱ्यांना अँड्रॉइड मोबाईलचा वापर करावा लागणार आहे. 'पीक पेरणी अहवाल ॲप' दिलेल्या लिंकवरून डाऊनलोड केल्यानंतर संबंधित सर्व माहिती शेतकऱ्यांनी भरावयाची आहे. यासाठी वैयक्तिक माहिती भरून खातेदार म्हणून नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. गट नंबर, खाते नंबर, जेवढी पिके असतील त्यांची माहिती, हंगामनिहाय माहिती, कायमपड, बांधावरील झाडे आदींची माहिती या अहवालात द्यावी लागणार आहे, तर पिकांचा फोटो काढून तो अपलोड करावा लागणार आहे.

ही मोहीम अधिक जलद व सुलभ व्हावी यासाठी कृषी, महसूल विभाग सध्या डेमो ॲप डाऊनलोड करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करून मार्गदर्शन करीत आहे. त्यासाठी प्रबोधन सप्ताह राबविला जात आहे. यानंतर १५ ऑगस्टपासून प्रत्यक्ष हा उपक्रम गावागावांतून शेतकऱ्यांच्या सहभागातून राबविला जाणार आहे. या अहवालानुसार सातबारा पत्रकावर पिकांच्या नोंदी होणार आहेत.

शेतकऱ्यांच्या सहभागातून माहिती संकलनामध्ये पारदर्शकता आणणे, शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीकपाहणी दावे निकालात काढण्याची प्रक्रिया सोपी व्हावी, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या दृष्टिकोनातून हा उपक्रम हाती घेतला आहे.यासाठी टाटा ट्रस्टकडून हे ॲप विकसित करण्यात आले आहे.

तालुका, जिल्हा, विभाग ते राज्य पातळीवर सनियंत्रण समित्या स्थापन करून हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जाणार आहे.