शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

आता करो या मरो आंदोलन

By admin | Updated: February 8, 2015 00:50 IST

‘एव्हीएच‘ प्रश्न : लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार : संध्यादेवी कुपेकर; हरीत लवादाकडे दाद मागणार

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील ‘एव्हीएच’ प्रकल्पाने विरोध डावलून उत्पादन सुरू केले आहे. त्या विरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. भविष्यात प्रकल्प हद्दपार होईपर्यंत ‘करो या मरो’ असे आंदोलन हाती घेणार आहे. या प्रश्नासंंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार आहे, अशी माहिती चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. कुपेकर म्हणाल्या, नव्या शासनाने प्रकल्पातील उत्पादनाला परवाना दिली आहे. त्याच्या विरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आहे. प्रतिकात्मक राजीनामेही दिले. भविष्यात वेळ पडल्यास या प्रश्नासाठी आम्ही खरोखर राजीनामाही देवू. मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र बैठक बोलावून एव्हीएचसंंबंधी आमच्या भावना समजावून घ्याव्यात, अशी मागणी आहे. एव्हीएच विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली पक्षविरहित आंदोलन सुरू आहे. त्यामुळे यापुढील काळातील आंदोलनात सर्व पक्ष, वकील, डॉक्टर, विद्यार्थी, आदी संघटनाही सहभागी व्हावेत. आंदोलनाच्या नेत्या डॉ. नंदा बाबूळकर म्हणाल्या, एव्हीएच प्रकल्पामुळे निसर्गावर विपरित परिणाम होणार आहे. शेती नापीक होणार आहे. मानवी जीवनावर गंभीर परिणाम होणार आहेत. त्यामुळे प्रकल्पाला कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड या राज्यांनी परवानगी नाकारली. जिंदाल उद्योग समूहाची कर्नाटकातील बळ्ळारीला हजारो एकर जमीन असताना चंदगड तालुक्यातील हलकर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये एव्हीएच प्रकल्प सुरू करण्यामागचे षड्यंत्र काय? सुरुवातीला स्टीलचा प्रकल्प असणार म्हणून तत्कालीन लोकप्रतिनिधींनी विरोध केला नाही. कस्तुरीरंगन अहवालातील संवेदनशील २१ गावांपैकी किट्टवडे गाव प्रकल्प स्थळापासून केवळ एक किलोमीटर हवाई अंतरावर आहे. कर्नाटकातील बळ्ळारी जिल्ह्यातून तोरंगल्लू येथून ३१८ किलोमीटरवरून येणार आहे. तयार माल निर्यातीसाठी जयगड बंदरापर्यंत नेण्यात येणार आहे. कंपनीने प्रदूषण नियंत्रण मंडळासह अन्य विभागाला खोटी, बनावट, दिशाभूल करणारी माहिती देवून परवाना घेतला. वस्तुस्थिती लपविलेली आहे.