शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूर प्रकल्पविरोधक २५जणांना नोटीस जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2015 00:54 IST

जनहक्क सेवा समिती : शनिवारच्या आंदोलनाबाबत उत्सुकता

राजापूर : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधात जनहक्क सेवा समितीने पुकारलेल्या १२ डिसेंबर रोजीच्या जेलभरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सुमारे २५ प्रमुख आंदोलनकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. प्रकल्प स्थळापासून एक किलोमीटर परिसरात मनाई आदेश लागू केला आहे. त्यामुळे आता हे आंदोलन कशा प्रकारे होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी जनहीत सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाशी समझोत केल्यामुळे व येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भूसंपादनाचे अनुदान स्वीकारल्यामुळे गेल्या दोन - तीन वर्षांपासून प्रकल्पविरोधी धार कमी झाली होती. माडबनवासीयांनी या प्रकल्पाच्या विरोधातून काढता पाय घेतल्यानंतर या प्रकल्पविरोधाची धार बोथट झाली होती.दरम्यानच्या काळात शिवसेना व प्रकल्प परिसरातील काही गावांमधील लोकांनी एकत्र येऊन या प्रकल्पाविरोधात जनहक्क समिती स्थापन करून आपला विरोध कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये साखरीनाटेतील मच्छिमार बांधवांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी रत्नागिरीतही एक मोर्चा काढला होता.या जेलभरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख २५ नेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत, तर याबाबतची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे. यासाठी जिल्हाभरातून पोलीस फौजफाटा मागवण्यात आल्याची माहिती सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक मेघना बुरांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानेही प्रकल्पस्थळापासून १ किमीच्या परिसरात मनाई आदेश लागू केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आत जनहक्क समिती व शिवसेनेने पुकारलेले हे आंदोलन कितपत यशस्वी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)संताप : प्रकल्पाविरोधी पुन्हा एल्गारजपानचे पंतप्रधान अँबे शिंके हे भारत भेटीवर येत असून, त्यांच्या या दौऱ्यात अणुऊर्जा कार्यक्रमावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या जनहक्क समिती व शिवसेनेने १२ डिसेंबर रोजी जेलभरो आंदोलन पुकारुन प्रकल्पाविरोधात पुन्हा एकदा एल्गार केला आहे.जनहीत सेवा समितीने या प्रकल्प विरोधातून आपले अंग काढून घेतल्यानंतर फारशी आंदोलने झाली नाहीत. माडबन परिसरातील जनतेनेही या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे आता १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या प्रकल्पविरोधी जेलभरो आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.आंदोलकांची कोंडीप्रशासनाने जैतापूरविरोधक आंदोलकांची याही आंदोलनात कोंडी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे हे आंदोलन कसे होणार? याबाबत उत्सुकता आहे.