शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

‘ना सत्तेसाठी, ना मतांसाठी, छत्रपती परिवार भिजला मराठ्यांच्या न्यायासाठी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST

कोल्हापूर : ‘ना सत्तेसाठी, ना मतांसाठी... छत्रपती संभाजीराजेंचा परिवार भिजला मराठ्यांच्या न्यायासाठी...!’, ‘छत्रपती खडे तो सरकार से भी ...

कोल्हापूर : ‘ना सत्तेसाठी, ना मतांसाठी... छत्रपती संभाजीराजेंचा परिवार भिजला मराठ्यांच्या न्यायासाठी...!’, ‘छत्रपती खडे तो सरकार से भी बडे...!’ अशा विविध संदेश कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या मूक आंदोलनाची छायाचित्रे, व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. मराठा समाजातील बांधव, भगिनी आणि तरुणाईने फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडियावर मूक आंदोलनाची मशाल तेवत ठेवली.

मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांनी मूक आंदोलन जाहीर केल्यापासून या आंदोलनाबाबतच्या प्रत्येक घडामोड मराठा समाजातील तरुणाईकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत होती. ‘१६ जून चलो कोल्हापूर’ अशी आंदोलनाची साद देणाऱ्या संदेशांचा समावेश होता. कोल्हापुरात बुधवारी आंदोलनानंतर ‘ना सत्तेसाठी, ना मतांसाठी... छत्रपती संभाजीराजेंचा परिवार भिजला मराठ्यांच्या न्यायासाठी...!’ , ‘छत्रपती खडे तो सरकार से भी बडे...!’ , ‘मतासाठी नव्हं तर मराठा आरक्षणासाठी पावसात भिजणारा जाणता राजा, कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती’, ‘एकच मिशन मराठा आरक्षण’, ‘एक मराठा लाख मराठा’ आदी संदेश खासदार संभाजीराजे आणि त्यांच्या परिवारातील अन्य सदस्यांच्या आंदोलनस्थळावरील छायाचित्रे, व्हिडीओ व्हायरल झाले. अनेकांच्या डीपी, प्रोफाइलवर ते झळकले.

चौकट

अन्य बांधवांपर्यंत आंदोलन पोहचविले

दरम्यान, आंदोलनाला उपस्थित असणाऱ्या काही समन्वयक, मराठा समाजातील तरुणाईने सोशल मीडियाच्या माध्यमातून अन्य समाजबांधवांपर्यंत हे आंदोलन पोहोचविले.

फोटो (१६०६२०२१-कोल-मूक आंदोलन सोशल मीडिया ०१) : ‘ना सत्तेसाठी, ना मतांसाठी... छत्रपती संभाजीराजेंचा परिवार भिजला मराठ्यांच्या न्यायासाठी...!’ या संदेशासह हे छायाचित्र बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले.

फोटो (१६०६२०२१-कोल-मूक आंदोलन सोशल मीडिया ०२) : ‘छत्रपती खडे तो सरकार से भी बडे...!’ या संदेशासह हे छायाचित्र बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले.

फोटो (१६०६२०२१-कोल-मूक आंदोलन सोशल मीडिया ०३) : ‘मतासाठी नव्हं तर मराठा आरक्षणासाठी पावसात भिजणारा जाणता राजा, कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती’, ‘एकच मिशन मराठा आरक्षण’, असे संदेश बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले.