शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

कायदा मोडणारे नव्हे, पाळणारे सरकार

By admin | Updated: April 3, 2015 00:38 IST

‘पी. एन.’ यांच्यावर ‘दादां’चा पलटवार

कोल्हापूर : भाजपमध्ये हम करोसे कायदा नाही. कायदा मोडणारे नव्हे, तर पाळणारे सरकार असल्याने कोणाच्या मनासारखे निर्णय होत नसल्याचा पलटवार सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यावर गुरुवारी केला. ‘गोकुळ’, ‘केडीसीसी’मधील आमच्या ताकदीचा अंदाज असल्याने पारंपरिकांबरोबर जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पी. एन. पाटील यांच्या तक्रारीला प्रत्त्युत्तर दिले. अमल महाडिक हे भाजपचे आमदार आहेत तरीही सहकारमंत्री तुमचे ऐकत नाहीत, असा तक्रारीचा सूर पी. एन. पाटील यांनी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे बुधवारी व्यक्त केला होता. याबाबत मंत्री पाटील यांना विचारले असता, कायद्याप्रमाणे ३० जूनअखेर पात्र सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक आहे. कायद्याप्रमाणे ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. धुळे जिल्हा बॅँकेची निवडणूक लावू नये, असा आमच्या आमदारांचा आग्रह आहे; पण कायद्यानुसार निवडणूक घ्यावीच लागणार आहे. भाजपमध्ये ‘हम करोसे कायदा नाही, कायदा हवा तसा वाकवला जाईल, असे कोणी गृहीत धरू नये, आम्ही चौकटीत राहून काम करणारी मंडळी आहोत,’ असा टोलाही मंत्री पाटील यांनी हाणला. कॉँग्रेस आघाडीचे सरकार असताना तत्कालीन सहकारमंत्री त्यांच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा देत होते, याबाबत विचारला असता, हाच तर दोन्ही सरकारमधील फरक आहे. भाजप न्यायाच्या बाजूने जात आहे, आम्ही कायदा मोडणारे नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. ‘गोकुळ’मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाच उमेदवारी अर्ज दाखल केले. स्वतंत्र पॅनेल करता येण्यासारखी आमची ताकद नाही, याचे भान ठेवून काम करीत आहे. जिल्हा बँकेबाबत पारंपरिक पक्षांच्या बरोबर जाण्याचा विचार असून, कोण बरोबर घेईल त्यांच्याबरोबर जाणार असल्याचेही सांगितले. (प्रतिनिधी)