शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल बांधकाम सुरू केल्यावर नामंजुरीचा आदेश

By admin | Updated: July 14, 2014 01:01 IST

हातकणंगले पंचायत समिती : जिल्हा परिषदेचा अजब कारभार

हातकणंगले : तालुक्यातील इंदिरा आवास घरकुल योजनेची ३१९ घरे जिल्हा परिषदेकडून मंजूर करण्यात आली होती. सर्वसाधारण गटातील लाभार्र्थींना पंचायत समितीने काम सुरू करण्याचे आदेश दिले असताना जिल्हा परिषदेकडून मंजुरी संख्या कमी करून २६० लाभार्र्थींना घरे देण्याचा सुधारित आदेश दिल्यामुळे तालुक्यातील जनरल गटातील ५९ लाभार्थी घरांपासून वंचित राहणार असल्याने पंचायत समिती प्रशासनाची कोंडी झाली आहे.तालुक्यातील ६२ गावांतील ग्रामपंचायतींनी ग्रामसभा बोलावून दारिद्र्यरेषा यादीतील लाभार्थींच्या गुणसंख्येवर, लाभार्र्थींकडे असलेल्या घरबांधणीसाठीच्या पडसर जागेच्या उपलब्धीनुसार ग्रामपंचायतीने गावातील लाभार्थी निवड करून अशा लाभार्र्थींची यादी पंचायत समितीकडे पाठवली होती.या यादीची छाननी करून पात्र लाभार्थींना घर मंजूर करण्यासाठी ही यादी जिल्हा परिषदेकडे पाठवली होती. पंचायत समितीकडून आलेल्या यादीनुसार तालुक्यातील सर्वसाधारण गटातील ३१९ लाभार्र्थींना घरे मंजूर केल्याचा आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने पंचायत समितीकडे पाठविला. जिल्हा परिषदेच्या आदेशाची अंमलबजावणी करत पंचायत समितीने ३१९ लाभार्र्थींना घर बांधकाम करण्याचे आदेश दिले. ५९ लाभार्थींनी पंचायत समितीच्या आदेशानुसार घरकुलाचे काम सुरू केले आहे. घरकुलाचे काम सुरू झाले असताना लाभार्र्थींना कोणत्या प्रकारे घरकुल नामंजूर झाले आहे, हे सांगण्याचे धाडस पंचायत समिती प्रशासनामध्ये नसल्यामुळे पंचायत समिती प्रशासनाची कोंडी झाली आहे. (प्रतिनिधी)