शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षा झालेल्या कैद्यांना कारागृहात ‘नो एन्ट्री’

By admin | Updated: December 16, 2014 23:36 IST

सुत्रांची माहिती : जीर्ण इमारतीमुळे महत्त्वाच्या प्रकरणातील आरोपी अन्यत्र...

रत्नागिरी : रत्नागिरी येथील विशेष जिल्हा कारागृहात शिक्षा झालेले अन्य ठिकाणचे कैदी ठेवणे गेल्या १५ वर्षांपूर्वीच बंद केले आहे. त्यानंतर केवळ न्यायाधीन (कच्चे) कैदीच या कारागृहात ठेवले जात आहेत. सध्या या कारागृहात ११७ न्यायाधीन कैदी असून, त्यात ८ महिलांचा समावेश आहे. पोटगी प्रकरणात सुमारे महिनाभराची शिक्षा असलेले १० कैदीही येथे असल्याची माहिती कारागृहाच्या सुत्रांनी दिली.पंधरा वर्षांपूर्वी या कारागृहात जिल्ह्याबाहेरील अनेक महत्त्वाच्या प्रकरणातील शिक्षा झालेले कैदी ठेवण्यात येत असत. मात्र, कारागृहाची ही इमारत ब्रिटिशकालीन व जीर्ण आहे. या विशेष कारागृहाला जुना इतिहास आहे. इमारत जीर्ण झाल्यामुळे याठिकाणी महत्त्वाच्या प्रकरणातील किंवा शिक्षा झालेले कैदी ठेवले जात नाहीत. केवळ न्यायाधीन कैदीच येथे ठेवले जातात. ज्यांच्यावर न्यायालयात खटला सुरू आहे, आरोपपत्र दाखल आहे, अशाच प्रकरणातील कैदी सुमारे तीन महिन्यांपर्यंत या कारागृहात ठेवण्यात येतात, अशी माहिती कारागृहाच्या सुत्रांनी दिली. रत्नागिरी विशेष कारागृह व परिसर अशी तब्बल १६ एकरची जागा असून, या जागेत विशेष कारागृहाची अद्ययावत इमारत उभारणे शक्य आहे. त्याबाबतचा प्रस्तावही अनेक वर्षे शासन दरबारी धूळ खात आहे. त्याबाबत येथील लोकप्रतिनिधीही फारसे उत्साही नसल्याने त्या प्रस्तावावरील धूळ अद्याप झटकली गेलेली नाही. त्यामुळे कारागृहाची अद्यावत इमारत अद्यापही झालेली नाही.या कारागृहाच्या प्रस्तावाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही तर जिल्ह्यातील हे ऐतिहासिक विशेष कारागृह अन्यत्रही जाण्याची भीती आता नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी) कारागृह वास्तू जतन करावीखरेतर काही ‘वास्तू’ या जतन करून ठेवण्याजोग्या असतात. रत्नागिरीतील विशेष कारागृहाची इमारत ही जुन्या वास्तूंमधीलच आहे. त्यात स्वा. वि. दा. सावरकर यांना तेथे बंदी बनवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे ती जपण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. याच कारागृहाच्या सहा एकर जागेत दुसऱ्या ठिकाणी अद्ययावत कारागृह उभारणे शासनाला शक्य आहे.