शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपुत्रांचे विस्थापन नको

By admin | Updated: November 6, 2014 22:00 IST

भूषण गगराणी : रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणारे प्रकल्प आणणार

चिपळूण : लोटे औद्योगिक वसाहतीत नवीन कारखाने आणताना येथे प्रदूषण होणार नाहीत, भूमिपुत्र विस्थापित होणार नाहीत, असेच उद्योगधंदे आणून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील व प्रदूषण नियंत्रित केले जाईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी केले. चिपळूण शहरातील गोवळकोट येथील भोईराज सभागृहात आज (गुरुवारी) सामूहिक भविष्याच्या शोधात या विषयावर परिवर्तन संस्था व अ‍ॅक्शन एड असोसिएशन मार्फत मुंबईत लोकसंवाद घेण्यात आला. यावेळी अखिल दाभोळखाडी भोई समाजाचे अध्यक्ष आर. आर. जाधव अध्यक्षस्थानी होती. या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी ढेकणे, एमआयडीसी मुख्य अभियंता सोनजे, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, विभागीय व्यवस्थापक निरजा भटनागर, उज्जैयिनी हालीम, दाभोळ खाडी भोई समाजाचे सचिव शांताराम जाधव, दाभोळखाडी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष पडवळ, नऊगाव मानव हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष हुसैन ठाकूर, परिवर्तनचे कार्यकारी संचालक अशोक कदम, श्यामल कदम उपस्थित होते. या मान्यवरांचे स्वागत परिवर्तनचे गणेश खेतले यांनी केले. लोटे औद्योगिक विस्तार क्षेत्रात औद्योगिक विकास होऊ घातला असून, या औद्योगिकीकरणाबरोबर स्थानिक भूमिपुत्र तसेच मच्छिमारांचाही विकास होणार आहे. मात्र, प्रदूषणाची समस्या मिटावी व दाभोळ खाडी प्रदूषणमुक्त व्हावी, यासाठी हा संवाद होता. यावेळी लोटे औद्योगिक वसाहतीतील सीईटीपी प्रकल्पाची उभारणी व देखभाल दुरुस्ती औद्योगिक वसाहत करुन घेणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध झाला असून, हे काम लवकरच पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) चिपळुणातील गोवळकोट भागात भोईराज सभागृहात झालेल्या लोकसंवादात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, उज्जैयिनी हालीम, निरजा भटनागर, आर.आर. जाधव, शांताराम जाधव, हुसैन ठाकूर, अशोक कदम, श्यामल कदम उपस्थित होते. प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार. बेरोजगारी हटवण्यासाठी येथे कारखानदारी आणणार. आंबा, काजू, भातशेती व मासेमारीला धोका होईल असे कारखाने आणणार नाही. संघर्ष समितीच्या अनेक प्रश्नांची दिली उत्तरे. शासकीय अधिकाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधल्याने समाधान. सीईटीपी प्रकल्पाचे काम लवकरच मार्गी लावणार. लोटेत २७२ पैकी २१८ कारखाने सुरु.