शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

डेंग्यू नाही; मात्र काळजी घ्या

By admin | Updated: November 25, 2014 23:56 IST

मनपा यंत्रणा सज्ज : डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत घट

कोल्हापूर : पावसाळ्यानंतर दूषित पाण्यापासून हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू ताप, चिकनगुन्या यासारखे रोग पसरण्याचा धोका असतो. राज्यभर हिवताप व डेंग्यूसदृश आजारांच्या रुग्णांत वाढ होत असतानाच कोल्हापुरात असे रुग्ण आढळण्याचे प्रमाण आता कमी होऊ लागले आहे. मागील महिन्यात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या ४८ होती, ती आता १० झाली आहे. औषध फवारणीसह साचलेले पाणी वाहते करणे, सर्वेक्षण आदी कामांना महापालिकेने प्राधान्य दिले आहे. डेंग्यू नसला तरी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील व आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी केले आहे.डास प्रतिबंधक औषध फवारणीच्या फेऱ्या सुरू आहेत. मागील वर्षी याच कालावधीत हिवताप व डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते. औद्योगिकीकरणाच्या वाढीमुळे सुमारे एक लाखापेक्षा अधिक संख्येने जिल्ह्यात परराज्यांतून मजूर आले आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, आदी भागांतील हिवतापग्रस्तांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या परिसरात बराच कालावधी वास्तव्य करून आलेल्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.शहरी भागातही डेंग्यूसदृश आजारांचा रुग्ण आढळल्यास तत्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा. हिवताप रुग्णांची तपासणी पालिकेच्या आरोग्य केंद्रात, तर डेंग्यूची तपासणी ‘सीपीआर’मध्ये करण्याची सोय आहे. त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे डॉ. पाटील केले आहे. (प्रतिनिधी)नागरिकांनी घ्यावयाची काळजीप्रत्येक तापाच्या रुग्णांनी रक्त तपासणी अवश्य करावी.हिवताप असल्यास त्वरित औषधोपचार घ्यावा.हिवताप रुग्णांच्या घरातील सर्वांनी रक्ततपासणी करणे गरजेचे आहे.तुंबलेल्या गटारी वाहत्या करा.ताप अंगावर काढू नका. वैद्यकीय उपचार घ्या.साचलेल्या पाण्यावर रॉकेल व जळके तेल टाकून डासांची उत्त्पत्ती रोखा.डबक्यांमध्ये डास अळीभक्षक गप्पी मासे सोडा. जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्या