शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
2
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
3
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
7
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
8
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
9
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
10
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
11
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
12
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
13
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
14
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
15
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
16
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
17
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
18
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
19
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
20
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण

ना कॉल, ना ओटीपी, तरी बँकेतून पैसे गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:18 IST

भीमगोंड देसाई : लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना काळात ऑनलाइन पैशांचे व्यवहार वाढल्याने ना कॉल, ना ओटीपी, ...

भीमगोंड देसाई : लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना काळात ऑनलाइन पैशांचे व्यवहार वाढल्याने ना कॉल, ना ओटीपी, तरी बँकेतून पैसे गायब होण्याच्या घटना वाढत आहेत. फ्री गेम, अनोळखी ॲप डाऊनलोड केल्याने असे प्रकार वाढत असल्याचे सायबर पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे.

मोबाइलवर फ्री गेम ॲप, ऑनलाइन पेमेंट ॲप डाऊनलोड केल्यानंतरही खात्यातून पैसे जातात. अनेक ॲपमध्ये ‘ऑटो रिड ओटीपी’ परमिशन घेतली जाते. त्यातून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. कोरोनामुळे आंतरजिल्हा आणि राज्यात जाऊन पोलिसांना तपास करता येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे फसवणूक झाल्यास पैसे मिळण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. घरफोड्या करणाऱ्या टोळ्या ज्याप्रमाणे सक्रिय असतात, त्याप्रमाणे अलीकडे ऑनलाइन फसवणूक करण्यासाठीही टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. पण यासंंबंधीचे गुन्हे दाखल करण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण इतर गुन्ह्याच्या तुलनेत कमी आहे.

१) ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे

२०१९ -२१

२०२० - १८

२०२१ मेपर्यंत - ९

२) लाखो रुपयांची फसवणूक (बॉक्स)

वर्षाला ऑनलाइन फसवणुकीतून लाखो रुपयांची फसवणूक होते. सध्या ऑनलाइन पैशांची, देवाण घेवाण वाढल्याने गेल्या वर्षापासून ऑनलाइन पैशांची चोरी करण्याकडे कल वाढला आहे. फेसबुक, वॉट‌्स ॲपवर सुंदर युवती चॅटिंग करून ब्लॅकमेल करीत ऑनलाइन पैसे उकळले जात आहेत. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढल्याचे सायबर शाखेतील पोलीस सांगतात. शहर आणि जिल्ह्यात रोज असे चार ते पाच प्रकार घडतात. पण फसवणूक झालेले प्रतिष्ठेला धक्का लागेल म्हणून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत नाहीत.

३) पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच (बॉक्स)

ऑनलाइन पैशाची फसवणूक करणारी टोळी आंतरराज्य आहे. मुख्य केंद्र मध्य प्रदेश, नोयडा, राजस्थान, बिहार या राज्यात आहे. अलीकडे पैसे पाठवलेल्या दुसऱ्या क्षणाला ते काढून घेण्याची यंत्रणा लुटणाऱ्या टोळीने तयार केली आहे. यामुळे गेलेले पैसे परत मिळवणे अडचणीचे झाल्याचे सायबर पोलीस सांगतात. फसवणुकीसाठी बनावट व्यक्तीचे कागदपत्रे वापरून काढलेल्या बँक खात्याचा वापर केल्याचेही तपासात उघड झाले आहे. अशा विविध कारणांमुळे ऑनलाइन फसवणूकव्दारे गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे. गेल्यावर्षी फसवणुकीची नोंद असलेल्या १८ गुन्ह्यांपैकी केवळ ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. यामधून ४ लाख ८० हजार रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

४) अनोळखी अॅप नकोच

फसवणूक टाळण्यासाठी मोबाइलवर कोणतीही लिंक, ॲप डाऊनलोड करताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अनावश्यक लिंक ओपन करू नये, ॲप डाऊनलोड करताना पैसे पाठवण्याची ऑफर स्वीकारू नये. पैसे मागणाऱ्याची ओळख पटल्याशिवाय कोणत्याही क्षणी पैसे पाठवू नये, असे पोलीस आवाहन करतात.

५) सायबर सेल अधिकाऱ्यांचा कोट

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी अनोळखी लिंक, ॲप डाऊनलोड करण्याचा मोह टाळावा. अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. अन्यथा यातूनही ऑनलाइन पैसे पाठवण्यासाठी गळ घातले जाते. पैसे मागणाऱ्या व्यक्तीची ओळख पटल्याशिवाय ते पाठवू नये. केवायसी, ओटीपी नंबर अनोळखी व्यक्तींना देऊ नये.

श्रीकांत कंकाळ, पोलीस निरीक्षक, सायबर विभाग