शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

निराधार सुनीताला मिळाला संजय गांधी योजनेचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST

उचगाव: कोविड-१९ काळात ओढावलेल्या आपत्तीत तिच्या पतीचं निधन झालं. पतीच्या मृत्यूनंतर दोन मुलांचा व वयोवृद्ध सासू -सासऱ्याची जबाबदारी ...

उचगाव:

कोविड-१९ काळात ओढावलेल्या आपत्तीत तिच्या पतीचं निधन झालं. पतीच्या मृत्यूनंतर दोन मुलांचा व वयोवृद्ध सासू -सासऱ्याची जबाबदारी तिच्या खांद्यावर आली. गरिबीचे चटके सहन करत असताना कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे संजय गांधी निराधार योजनेचे संतोष कांबळे (गडमूडशिंगी ) व युवा ग्रामीण विकास संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते मोहन सातपुते यांनी निराधार योजनेतून तिला विशेष साह्य मिळावे म्हणून प्रयत्न केले आणि पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नामुळे तिला संजय गांधी निराधार योजनेतून अर्थसाह्य मिळाल्याचे नुकतेच पत्र सुनीता शरद गवळी रा.महालक्ष्मीनगर ,उजळाईवाडी यांना प्रदान करण्यात आले.

पालकमंत्री सतेज पाटील,आ.ऋतुराज पाटील व प्रतिमा सतेज पाटील यांच्या पुढाकाराने कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील ३६ गावात सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे तळमळीने संजय गांधी निराधार योजनेवर काम करत आहेत. त्यांनी अनेक निराधार,विधवा,दिव्यांग,विशेष घटकाला न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या समाजकार्यामुळे अनेकांना आयुष्यभराचा आधार मिळाला आहे.

विशेष म्हणजे निराधाराचा ते आधार बनले आहेत. तहसीलदार कार्यालयात वयोवृद्ध नागरिकांना हयातीचे व उत्पन्नाचे दाखले जमा करावे लागत होते.तर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडेही जावे लागत होते. कोविड संसर्गजन्य परिस्थितीत वृद्धांना त्रास नको म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तलाठी कार्यालयातच दाखले जमा करावेत अशी मागणी केली आणि आता हे दाखले तलाठी कार्यालयात जमा होत असल्याने वयोवृद्धाचा त्रास कमी झाला आहे.

शासनाच्या विविध घटकांसाठी असलेल्या योजनांविषयी मार्गदर्शन करून त्यांना विशेष योजनांचा विनामोबदला लाभ मिळवून देणाऱ्या संतोष कांबळे यांच्या तळमळीला सलाम करावाच लागेल

फोटो : निराधार सुनीता शरद गवळी यांना संजय गांधी निराधार योजनेतून पेन्शन योजना मजूर झाल्याचे पत्र देताना संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य संतोष कांबळे.