शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडची बांगलादेशवर ७७ धावांनी मात

By admin | Updated: December 27, 2016 00:33 IST

सलामीवीर टॉम लॅथमची कारकिर्दीतील सर्वोत्तम १३७ धावांच्या खेळीनंतर जिमी निशाम व लोकी फर्ग्युसन यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या वन-डे आंतरराष्ट्रीय

कोल्हापूर : साहित्य व चित्रपट या दोन्ही क्षेत्रांची माध्यमे, भाषा निराळी आहे; परंतु दोन्हींचा आशयबिंदू एकच असतो. सर्वांगांनी जीवनाचा वेध घेत, समाजदर्शन, स्वभाववैशिष्ट्ये, नाती, सुख, सुखाचे पदर उलगडणारे साहित्य व चित्रपट या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा सूर सोमवारी मुक्तसंवादात पाहावयास मिळाला. कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे राजर्षी शाहू स्मारक येथे पाचव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (किफ्फ) मध्ये मुक्तसंवाद रंगला. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभाग प्रमुख प्रा. डॉ. राजन गवस, प्रा. कृष्णात खोत, ज्येष्ठ पटकथाकार सुमित्रा भावे, चंद्रकांत जोशी यांनी सहभाग घेतला.डॉ. गवस म्हणाले, चित्रपट निर्मितीतून कल्पित रचनेचे दर्शन घडते. चित्रपट व साहित्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत; त्यामुळे लेखक किंवा दिग्दर्शक यांच्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा फरक करणे योग्य नाही. साहित्याचे माध्यमीकरण होताना लेखकाला समाजाप्रती द्यावयाचा संदेश नीट पोहोचतो की नाही, ते पाहणे महत्त्वाचे आहे. साहित्यकृतीवर आधारित सिनेमामुळे पुस्तकांच्या विक्रीत वाढ झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भावे म्हणाल्या, साहित्याला अभिजात दर्जा आहे, स्थान आहे. त्यामानाने चित्रपट अजूनही बाल्यावस्थेत आहे. अनेकदा प्रसिद्ध कादंबरीवर निघालेला चित्रपट प्रभाव पाडू शकत नाही; क ारण कादंबरीतील पात्रे, पोशाख, कथेचा पोत वाचक मनात तयार करीत असतो; पण चित्रपट पाहताना त्याला आपल्या मनात तयार असलेली कल्पना चित्रपटात सापडतेच, असे होत नाही. साहित्य हे शब्दातून तयार होते; परंतु चित्रपटातील शांततेची ताकद जास्त प्रभावी असते. साहित्यकृतीच्या निर्मितीत फक्त एका लेखकाचा सहभाग असतो; तर चित्रपट ही सामूहिक कला आहे. चित्रपटाच्या निर्मितीवेळी ठोस भूमिका घ्यावी लागते; परंतु लेखक कपोलकल्पित जग निर्माण करतात. कृष्णात खोत म्हणाले, साहित्य व चित्रपट हे परस्परपूरक आहेत. कथेशिवाय सिनेमा पूर्णत्वास जाऊ शकत नाही. बऱ्याच साहित्यकृतींतून चित्रपटाची निर्मिती करणे अशक्य असते; तर एखाद्या सिनेमावरून एखादी कादंबरी वा कथा लिहावी, अशी प्रेरणा लेखकाला मिळू शकते. जोशी म्हणाले, ‘कोर्ट’सारखा सिनेमा म्हणजे व्यवस्थेच्या अवस्थेचं चित्रण. त्यात घटना, प्रसंग, कथा नाही; तरीही तो ठरतो. सिनेमात साहित्यातील जाणिवा उभ्या करता आल्या नाहीत तर सिनेमा फसतो. मुक्त संवादाचे आयोजन‘किफ्फ’अंतर्गत आज, मंगळवारी सायंकाळी पाच वाजता ‘भारतीय स्वातंत्र्यात चित्रपटांचे योगदान’ या विषयावर मुक्त संवाद होणार आहे. कार्यक्रम मोफत असून, रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. महोत्सवात आज या चित्रपट, लघुपटाचे सादरीकरणचित्रपट स्क्रीन १ : दुपारी १२ वा. - व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अ‍ॅन्ड चॉकलेट (मराठी), दुपारी २.३० वा.- ट्रॅव्हलर (इराण), सायंकाळी ६.३० वा.- सायकल (मराठी), रात्री ९ वा.- डॉ. स्ट्रॅग्लेव्ह आॅर : हाऊ आय लर्न्ड टू स्टॉप वरिंग अ‍ॅन्ड लव्ह (युके)स्क्रीन २ : सकाळी १० वा.- अदिम विचार (ओरिया), दुपारी १२ वा.-द हंट (डेन्मार्क), सायंकाळी ६.३० वा. अ क्युब आॅफ शुगर (इराण), रात्री ९.३० वा.- छोटा सिपाही (हिंदी) स्क्रीन ३ : सकाळी ९.३० वा.- आॅल द बेस्ट (क्रोएशिया), दुपारी १२ वा.- द कल्पेबल (जर्मनी), दुपारी २.३० वा.- २००१: ए स्पेस ओडिसी (युके).लघुपट स्क्रीन ३ : सायंकाळी ६.३० वा.- भगतसिंग (२१ मि.), सरोजिनी नायडू (२१ मि.), लोकमान्य टिळक (४१ मि.), द स्पिरीट आॅफ नॅशनॅलिझम (२१ मि.), बेगम हजरत महाल (२१ मि.), शहीद उधमसिंग (२५ मि.).